जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा अनुज्ञेय करणे व अशा संचित अर्जित रजेचे रोखीकरण करण्याबाबत ग्रामविकास विभागाने सहा जुलै 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करून अर्जित रजा अनुज्ञेय करणाऱ्या स्थगिती देऊन नवीन सुधारित शासन आदेश निर्गमित करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
बीड जिल्हा परिषदेकडून शासन निर्णय दि.०६.१२.२०२२ नुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दिर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा केव्हापासून अनुज्ञेय करावे, तसेच अनेक जिल्हा परिषद शिक्षकांकडून सदर शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वीच्या अर्जित रजांच्या रोखीकरणाची मागणी करण्यात येत आहे, याकरिता शासनाने मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.
३. या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांना असे कळविण्यात येते की, बीड जिल्हा परिषदेने उपस्थित केलेल्या मुद्याच्या अनुषंगाने उपरोक्त नमूद दि.०६.१२.२०२२ रोजीच्या शासन निर्णयात अधिक स्पष्टता येणे आवश्यक आहे. यास्तव, सदर शासन निर्णयात सुधारणा करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन आहे. यास्तव शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत शासन निर्णय दि.०६.१२.२०२२ ची अंमलबजावणी करण्यात येवू नये. असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना देण्यात आले आहे.
(वा. द. देशमुख)
उपसचिव, महाराष्ट्र शासन
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments