🌎 भूगोल शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम 🌍
भूगोल प्रज्ञाशोध केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे.
🌕 अधिक माहिती🌓
➡ परीक्षेचे स्वरूप
वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 50 बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास दोन गुण.
40 गुणांची पासिंग असेल.
➡ पात्रता
2023-24 मध्ये पाचवी ते बारावी इयत्तेचे मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थी पात्र असतील.
➡ अभ्यासक्रम
प्रत्येक इयत्तेचे भूगोल विषयाचे संपूर्ण पुस्तक 80 गुणांसाठी व मागील वर्षीचे भूगोल पुस्तक 20 गुणांसाठी.
➡ उत्तर पत्रिका
ओ एम आर स्वरूपाची असेल.
➡ परीक्षा केंद्र,स्थळ,वेळ
आपल्याच शाळेत परीक्षा घेण्यात येईल. दिनांक 9 डिसेंबर 2023 शनिवार सकाळी 10 ते 11.
➡ 100 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ठ करणाऱ्या शिक्षकांना उपक्रमशील भूगोल शिक्षक पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात येईल.
➡ बक्षिसे
राज्यात प्रथम - 5000 ₹
द्वितीय- 3500 ₹
तृतीय- 2500 ₹
गुणवत्ता यादीत येणाऱ्या 80 जणांना 200 ₹
+ मेडल व गुणवत्ता प्रमाणपत्र
➡ प्रमाणपत्र
40 गुण मिळवून उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र
➡
विद्यार्थ्यांचा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांचा सराव होण्याच्या दृष्टीने, भूगोल विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी व विद्यालयात भूगोल शिक्षकांना एक विशेष उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपल्या विद्यालयात आपण भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन कराल ही विनंती.
अधिक माहितीसाठी माहितीपत्रक शाळेत लवकरच प्राप्त होईल. माहितीपत्रक त्वरित हवे असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद
भूगोल प्रज्ञाशोध केंद्र, नवी मुंबई
9773737441
कृपया भूगोल विषय शिक्षक व शिक्षकांचे ग्रुप यावर फॉरवर्ड करा ही विनंती.
वरील संपूर्ण माहिती पत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
Swapnali pundlik Burungale
ReplyDeleteOk
Delete