महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 3 जुलै 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभेत तारांकित प्रश्न क्रमांक 65469 नुसार राज्यातील काही जिल्ह्यातील बदलीसाठी बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या शिक्षकांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना माहिती मागविली आहे.
राज्यातील काही जिल्हयातील बदलीसाठी बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या शिक्षकांबाबत. श्री. मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण), श्री. अमिन पटेल (मुंबादेवी), श्री. बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री. सुनिल केदार (सावनेर), श्री. विजय वडेट्टीवार (ब्रम्हपूरी), श्री. अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री. अशोकराव चव्हाण (भोकर), श्री. जितेश अंतापूरकर (देगलूर), श्री. शिरीष चौधरी (रावेर), प्रा. वर्षा गायकवाड (धारावी) श्री. विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), श्री. नानाभाऊ पटोले (साकोली), श्रीमती सुलभा खोडके (अमरावती), श्रीमती जयश्री जाधव (कोल्हापूर उत्तर), श्रीमती प्रतिभा धानोरकर (वरोरा), श्री. संजय जगताप (पुरंदर), श्री. ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण) सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) राज्यात काही जिल्हयात बदल्यांसाठी बोगस प्रमाणपत्र जोडून हव्या त्या ठिकाणी काही शिक्षकांनी बदल्या करून घेतल्या असल्याचे माहे मे,२०२३ च्या दुसऱ्या आठवडयात निदर्शनास आले, हे खरे आहे काय, (२) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी करून या शिक्षकांवर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?
उपरिनिर्दिष्ट प्रश्नाबाबतची वस्तुस्थिती या सचिवायलास त्वरीत दोन दिवसात कळवावी अशी विनंती आहे.
सदरहू प्रश्न स्वीकृत करण्यासारख्या आहे की नाही हे ठरविण्यासाठी ही माहिती आवश्यक असून ती हे पत्र मिळाल्यापासून दोन दिवसांच्या आत या सचिवालयास कळवावी. उक्त अवधीत आपणाकडून माहिती न आल्यास, प्रश्न स्वीकृत होऊन तो शासनाकडे उत्तरासाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे सदरहू प्रश्न स्वीकृत झाल्यास, तो दिनांक २१-०७-२०२३ रोजी उत्तरासाठी ठेवण्यात येईल.
कक्ष अधिकारी.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments