इयत्ता १ ली ते १० वी करिता विषयवार तासिका विभागणी शासन परिपत्रकानुसार (निर्णयानुसार)..
दिनांक २८ एप्रिल २०१७ रोजी इयत्ता १ ली ते ८ वी करिता विषयावर तासिका विभागणीबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. सदर परिपत्रकातील तासिका विभागणीत अंशतः बदल करण्यात आला आहे. सदर परिपत्रक सन २०१७-१८ च्या द्वितीय सत्रापासून लागू करण्यात येत आहे. १) इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी एका आठवड्यातील अध्ययन कालावधी ४५ तासिका ऐवजी ४८ तासिका राहील. २) एका वर्गाचा आठवडयाचा एकूण कार्यकाल पुर्वी २६.४५ मि.होता. प्रस्तावित परिपत्रकानुसार सदर कार्यकाल २७.१० मि. होईल त्यामुळे एकूण कार्यकालात २५ मिनिटांची वाढ होईल.. ३) दिनांक २८ एप्रिल, २०१७ च्या परिपत्रकाप्रमाणेच सोमवार ते गुरूवार ८ तासिका असतील. पहिली तासिका ४० मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची राहील व प्रत्येक दिवशीचा परिपाठ १० मिनिटांचा राहील.
४) सुधारीत परिपत्रकानुसार शुक्रवारी ८ तासिका ऐवजी ९ तासिका घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिकां ३० मिनिटांची राहील.
५) शनिवारी ५ तासिकांऐवजी ७ तासिका घेण्यात याव्यात. पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका ३० मिनिटांची राहील.
६) सुधारीत वेळापत्रकात शुक्रवार व शनिवारच्या तासिका हया कला आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी देण्यात याव्यात.
वर्ग एक ते दहावी पर्यंत विषयानुसार तासिका विभागणी परिपत्रक संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments