यु-डायस प्लस 2022-23 प्रणाली मध्ये शाळांची माहिती जिल्हा/तालुका स्तरावरून ऑनलाइन पद्धतीने प्रमाणित करणेबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयातून निर्गमित 22 जून 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
राज्यातील सर्व शाळांची अचूक माहिती युडायस प्लस प्रणालीमध्ये भरण्यासाठी या कार्यालयामार्फत कळविण्यात आलेले आहे. सदर माहिती अंतिमीकरण करण्याचे काम माहे मे, २०२३ पासून राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरील संगणक प्रोग्रामर, MIS Coordinator, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचेकडून सुरू आहे व माहितीमधील त्रुटींची पूर्तता करण्यात येत आहे.
याबाबत आपणास कळविण्यात येते की, युडायस प्लस प्रणालीमध्ये तालुका स्तरावरून ऑनलाईन पध्दतीने माहितीचे प्रमाणपत्र प्रमाणित करून अपलोड करण्यासाठी सुविधा केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. सदरचे प्रमाणपत्र दि.२७/०६/२०२३ पर्यंत तालुका व जिल्हा कार्यालयास अंतिम करून अपलोड करण्याकरिता उपलब्ध असणार आहे. सदरचे प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर आपल्या जिल्हा कार्यालयास त्याची एक प्रत ई- मेलव्दारे पाठविण्यात यावी.
प्रमाणपत्र वेळेत अपलोड न केल्यास युडायस सिस्टीमव्दारे माहिती अंतिम करण्यात येणार असल्याबाबत भारत सरकारकडून सूचीत करण्यात आले आहे, त्यानंतर कोणताही बदल करणे शक्य होणार नाही याची नोंद घेण्यात यावी. तरी आपण याबाबत गांर्भीयाने घेऊन शाळांची वस्तूनिष्ठ माहिती सादर करता येईल व त्यानुसार जिल्हयाचा व राज्याचा शैक्षणिक निर्देशांक उंचावण्यास मदत होईल.
(सरोज जगताप)
सह संचालक (कार्यक्रम) म.प्रा.शि.प., मुंबई.
वरील परिपत्रक संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments