YCMOU B. Ed Admission Process Second Round Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ च्या प्रवेश दुसरी फेरी यादी.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बीएड प्रवेश प्रक्रिया 2024 26 दुसरी निवड यादी जाहीर झालेली आहे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण आपल्या जिल्ह्याची दुसरी यादी पाहू शकता.
अधिकृत लिंक.


दिनांक : १४/११/२०२४

सूचना पत्र क्र. 07 बी.एड. २०२४-२०२६ या तुकडीचे खुल्या व राखीव प्रवर्गातील (द्वितीय) प्रवेश फेरी बाबत

सूचना

बी.एड. शिक्षणक्रमाच्या सन २०२४-२६ या तुकडीसाठी प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या प्रवेशेच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन

प्रवेश अर्जाची मूळ कागदपत्र पडताळणी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर घेण्यात आली. प्रथम कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार खुल्या आणि राखीव प्रर्वागातील ग्मेदवांराच्या प्रवेशासाठी यादी स्वतंत्र प्रसिद्ध करण्यात येत आहे.

१) निवड यादीतील उमेदवारांनी त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क रू. २३,३६०/- (माहितीपुस्तिकेतील पान क्र. २० वर नमूद केल्याप्रमाणे) दिनांक १४-१५ नोव्हेंबर २०२४ रोजी सांयकाळी ०५.०० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने डेबिट/क्रेडीट कार्ड, नेटबँकिंग यूपीआय इत्यादीचा वापर करून भरावयाचे आहे. सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय संबंधित उमेदवाराच्या लॉगीनमध्ये उपलब्ध आहे. प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क भरल्यानंतरच आपला बी.एड. शिक्षणक्रमाचा सन २०२४-२०२६ या तुकडीसाठी प्रवेश निश्चित होईल. विहित मुदतीत प्रवेश शुल्क उमेदवारांनी अदा न केल्यास संबंधित उमेदवार बी.एड. प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल आणि पुढील प्रवेश प्रक्रिया फेरीसाठी विचार केला जाणार नाही, याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी.

२) प्रथम वर्ष शुल्क यशस्वीपणे भरणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला पासवर्ड व लॉगीन आयडी टाकून प्रवेशाचे पत्र डाऊनलोड करता येईल. त्याच्या दोन प्रती काढून त्यातील एक प्रत आपल्या जिल्ह्यासाठी नियुक्त बी.एड. अभ्यासकेंद्रावर (माहितीपुस्तिकेतील पान क्र. २२ ते २५ वर नमूद केलेल्या ठिकाणी) जाऊन बी.एड. प्रथम वर्षाचे प्रवेशपत्र जमा करावे. तसेच पुढील पत्रव्यवहारासाठी संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा व कायमस्वरूपी पत्ता, मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती अभ्यासकेंद्रावर देण्यात यावी.

३) पुढील (द्वितीय) वर्षी पुन्हा बी.एड. ला आपला ऑनलाईन प्रवेश निश्चित करून त्यावेळी द्वितीय वर्ष विद्यापीठ शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे अनिवार्य असेल. अन्यथा सदर विद्यार्थी बी.एड. द्वितीय वर्षासाठी प्रवेशित मानला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

४) अभ्यासकेंद्रामार्फत आपणास बी.एड. शिक्षणक्रमातील अध्ययन साहित्य प्रथम संपर्कसत्रात देण्यात येईल. वैकल्पिक अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि पूरक अध्ययन साहित्य विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर Books: Free Download (Pdf) या टॅबवर सॉफ्टकॉपीमार्फत PDF/E-book स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहे याची नोंद घ्यावी.

५) जागा रिक्त राहिल्यास त्याच जिल्ह्यातील कागदपत्र पडताळणी झालेल्या पुढील उमेदवारांना गुणवत्तेनुसार संधी देण्यात येईल.

६) प्रवेश शुल्क अदा करतांना प्रोफाईल अपूर्ण असल्यास Fill complete profile असा मेसेज आल्यास डाव्या हाताला असणाऱ्या लिंकपैकी Fill complete profile या लिंकचा वापर करून आपली प्रोफाईल पूर्ण करून प्रवेश शुल्क अदा करावे. तसेच ABC ID व UGC-DEB ID कसा तयार करावा. याबाबत शंका असल्यास सूचनापत्र 07 च्या खाली लिंक उपलब्ध आहे. त्यानुसार कार्यवाही करावी.

७) उमेदवारांना शुल्क अदा करतांना काही अडचण आल्यास कृपया ०२५३-२२३०५८० या क्रमांकावर संपर्क साधावा.,

संचालक
विद्यार्थी सेवा विभाग




बी.एड. शिक्षणक्रमाच्या सन २०२४-२६ या तुकडीचे विभागीय केंद्र कागदपत्र पडताळणी समिती जिल्हानिहाय नियोजन तक्ता पुढील प्रमाणे



बी.एड (सेवांतर्गत) प्रवेशेच्छूक अध्ययनार्थीना प्रवेश अर्ज कागदपत्र पडताळणी संदर्भातील सूचना

 नमस्कार,

सर्व बी.एड. प्रवेशेच्छुक अध्ययनार्थीना कळविण्यात येते की, आपण बी.एड. प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे, उमेदवारांच्या जिल्हानिहाय कागदपत्र पडताळणी याद्या (Documents Verification List) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ज्या जिल्ह्यातून आपण अर्ज केला आहे, त्या जिल्ह्याच्या प्रवेश अर्ज व कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या नियोजित तारखेला आपण मूळ कागदपत्र व एका छायांकित प्रतीच्या संचासह सकाळी ठीक १०.०० वा. त्या-त्या जिल्ह्याच्या विभागीय केंद्रावर उपस्थित रहावे.

दिव्यांग उमेदवारांना स्वतः उपस्थित राहता येत नसल्यास, अन्य व्यक्तीला तसे अधिकार पत्र देऊन आपल्या मूळ कागदपत्रांसह अर्ज व कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित विभागीय केंद्रावर नियोजित दिवशीच पाठविणे बंधनकारक आहे. बी.एड. प्रवेश २०२४-२६ तुकडीसाठी अनुभवाची अंतिम दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

कागदपत्रे पडताळणीसाठी पुढील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक/अनिवार्य आहे.

१) बी.एड. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या प्रवेशेच्छुकांनी माहितीपुस्तिकेतील 'परिशिष्ट २' आणि ऑनलाइन प्रवेश अर्जासह कागदपत्र पडताळणीसाठी विभागीय केंद्रावर नियोजित दिवशी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

२) उमेदवाराने आपल्या प्रवेश अर्जाची छापील प्रत व प्रवेश अर्ज भरतेवेळी वापरलेला User Id व Password आणावा, त्याशिवाय आपल्या अर्जाची पडताळणी होणार नाही.

३) ऑनलाईन प्रवेश अर्ज व कागदपत्रांची पडताळणी केलेले बी.एड. प्रवेश अर्ज, सन २०२४-२६ तुकडीसाठीची गुणवत्ता यादीसाठी व प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील.

४) विभागीय केंद्रामार्फत बी.एड. प्रवेश अर्ज पडताळणी (Documents Verification) न करणारे उमेदवार सन २०२४-२६ तुकडीच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद होतील.

५) प्रवेश अर्ज पडताळणी करताना उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी समितीला प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीचे मूळ पुरावे सादर करणे बंधनकारक असेल. (पुरावे सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यात कोणत्याही स्वरूपाच्या नवीन माहितीची भर घातली जाणार नाही.) याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

६) विभागीय केंद्रावर प्रवेश अर्ज पडताळणी दरम्यान शांतता राखावी. कोणत्याही प्रकारचा गोंधळ गोंगाट निर्माण होणार नाही, याची काळजी घेवून समितीला पूर्णपणे सहकार्य करावे.

७) कागदपत्र पडताळणी समिती कक्षात फक्त उमेदवारांनाच प्रवेश करता येईल. उमेदवारांशिवाय अन्य नातेवाईकांना पडताळणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

८) उमेदवारांनी प्रवेश समितीवर कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी, जबरदस्ती, मारहाण, अपशब्द वापर, वाद घालणे, दस्तऐवज चोरणे, सरकारी कार्यालयात गोंधळ अथवा अनधिकृत जमाव केल्यास भारतीय दंड संहितेनुसार

(IPC) कार्यवाहीस पात्र राहतील याची नोंद घ्यावी.

९) अर्ज पडताळणी शक्यतो यादीत दिलेल्या क्रमाने करण्यात येईल. परिस्थितीनुसार विभागीय संचालक त्यात बदल करु शकतील व तो बदल सर्व उमेदवारांना बंधनकारक असेल.

१०) प्रवेश अर्ज कागदपत्रे पडताळणीसाठी समिती असेल. ती समिती प्रत्येक प्रवेशार्थीची वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती, शैक्षणिक अर्हता, शिक्षक म्हणून नियुक्ती आदेश, अध्यापनाचा एकूण सेवा अनुभव व समांतर / सामाजिक आरक्षण इ. तपशीलासंदर्भात सर्व माहिती उमेदवाराने सादर केलेल्या मूळ कागदपत्रांच्या आधारे तपासणी करतील. त्या संदर्भातील सर्व मूळ कागदपत्रे व एक फोटोकॉपी (छायांकित) संच ठेवावा. फोटोकॉपी (छायांकित) संच, तुमचा प्रवेश अर्ज तपासणी नंतर तुमच्या ऑनलाईन प्रवेश अर्जासोबत समितीकडे द्यावयाचा आहे

११) जर आपण आपल्या जिल्ह्याच्या दिनांकाला कागदपत्र पडताळणीसाठी वैद्यकीय, तांत्रिक व शासकीय कारणामुळे उपस्थित राहू शकणार नसाल, तर आपले मूळ कागदपत्रासह व आपण कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या अधिकार पत्रासह आपले अधिकार प्राप्त व्यक्तीला संबंधित दिनांकाच्या दिवशी विभागीय केंद्रावर मूळ कागदपत्रासह उपस्थित राहून आपल्या कागदपत्रांची पडताळणी करता येईल, मात्र याची सर्वस्वी जबाबदारी आपली स्वतःची असेल, याची नोंद घ्यावी.

अपेक्षित कागदपत्रे :

(क) ऑनलाईन संगणकीय मूळ अर्जाची प्रत.

ख) शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या मूळ व सत्यप्रती

(ग) प्रवेश अर्जात नोंद केल्याप्रमाणे प्रत्येक शाळेतील सुरूवातीपासून पुढील सर्व नेमणूकीच्या आदेशांच्या मूळ व प्रमाणित सत्यप्रती अनुभवाचे दाखले.

(घ) मागासवर्गीय असल्यास पुढे नमूद केल्याप्रमाणे मूळ प्रत व प्रमाणित सत्यप्रत-

* अनुसूचित जाती (SC) -

जातीचा दाखला

• अनुसूचित जमाती (ST) जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र

• विमुक्त जमाती भटक्या जाती इतर मागासवर्गीय/विशेष मागासवर्गीय (VJ/NT/OBC/SBC) जातीचा दाखला, ऑनलाईन संगणकीय अर्जात नमूद केलेल्या नावाचे वैध कालावधीचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र,

* आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गाच्या उमेदवारांना शासन नियमानुसार वेळोवेळी निर्देशित केलेली प्रमाणपत्रे / दाखले / दस्ताऐवज. 

* SEBC साठी सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र,

(च) उमेदवाराने प्रवेश अर्ज कागदपत्रे तपासणी करताना (माहितीपुस्तिकेतील परिशिष्ट क्र. २) आपण केलेल्या सेवेचा तपशील वरील तक्त्यात भरून प्रवेश अर्जासोबत जोडावा.

(छ) बी.एड. प्रवेश अर्ज कागदपत्रे पडताळणी करताना बी.एड. प्रवेश माहितीपुस्तिकेतील दिलेल्या महानगरपालिका आयुक्त / गट शिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी / जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी / मुख्याध्यापक / संस्था प्रमुख आश्रम शाळा असल्यास प्रशासन अधिकारी यांनी प्राथमिक शिक्षकांना दिलेले शिफारस प्रमाणपत्र पडताळणीस येताना प्रत्येक उमेदवारांनी भरून आणणे अनिवार्य आहे. त्याची फोटो प्रत ग्राह्य रली जाणार नाही. (माहितीपुस्तिकेतील परिशिष्ट क्र.-४)) जन्मतारखेचा पुरावा (ज दर्शविणारी कोणत्याही प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.

(झ) सर्व सेवेचे नेमणूक आदेश, शिक्षणाधिकारी/शिक्षण उपसंचालक यांच्या शिक्षक किंवा पदमान्यता पत्राच्या सर्व साक्षांकित प्रती, शाळा मान्यता पत्र.

सुरूवातीपासूनच्या (ण) शाळा अनुदानित असेल तर वर्षनिहाय शाळा तपासणी अहवालाच्या साक्षांकित प्रती.

(ट) सेवापुस्तिकेतील संबंधित नोंदी (संपूर्ण सेवापुस्तिकेची साक्षांकित केलेली फोटोकॉपी)

(ठ) नावात बदल असल्यास नाव बदल पुरावा म्हणून राजपत्र.

महत्वाचे :

आपण नोंदवलेल्या अध्यापन अनुभवाचा पुरावा म्हणून आपली मूळ सेवापुस्तिका/सेवा ऑर्डर/इन्स्पेक्शन रिपोर्ट इ. पैकी किमान एका मूळ दस्ताऐवजाची प्रत तुमच्याकडे असणे बंधनकारक आहे समितीला मूळ कागदपत्र तपासताना शंका निर्माण झाल्यास, त्या मुद्यांसंदर्भात दुसऱ्या पुराव्याची मागणी समिती करेल. त्यावेळी तात्काळ तुम्ही तो सादर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सेवा पुस्तिका व सेवा आदेशाच्या सर्व प्रती सोबत ठेवाव्यात. ११) आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या उमेदवाराकडे शासन नियमानुसार जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र व ना सायस्तर (नॉन क्रिमीलेयर) दाखला इ. शासन नियमानुसार आवश्यक ते दस्तऐवज असणे बंधनकारक आहे.

● १२) सामाजिक आरक्षणासंदर्भात लाभ घेणाऱ्या उमेदवारांकडे खालील पुरावे असावेत.

* दिव्यांग : दिव्यांग असल्याबाबतचे शासन निर्णयानुसार सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र (जिल्हा शल्य चिकित्सक)

* प्रकल्पग्रस्त : जिल्हा पुनर्वसन अधिकारी/सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी प्रमाणपत्र, परंतु त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे आवश्यक,

* आपत्तीग्रस्त : उपविभागीय अधिकारी/तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, परंतु त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे आवश्यक.

* स्वातंत्र सैनिक पाल्य : सैनिकाचा पत्नी/मुलगा/अविवाहित मुलगी यांनी स्वातंत्र सैनिकाच्या ओळखपत्राची प्रत

व पाल्याच्या नातेसंबंधाचा पुरावा. * आजी/माजी सैनिक पाल्य सैनिकाची पत्नी/मुलगा/अविवाहित मुलगी यांनी जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक नातेसंबंधाचा पुरावा, डिस्चार्ज पुस्तक आवश्यक. * विधवा : महानगरपालिका/नगरपालिका/ग्रामपंचायत यांच्याकडून प्राप्त झालेले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.

* घटस्फोटीता: विवाहनोंदणी दाखला किंवा न्यायालयाचे घटस्फोटाबाबतचे आदेश किंवा मुस्लीम महिलांच्या बाबतीत नियमाप्रमाणे निकाह लावणारे काझी/इमामांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र. ते प्रमाणपत्र नोटरी करून मराठी भाषेत भाषांतर करून आणणे आवश्यक.

* गोवा, बेळगाव, बिदर हा मराठी भाषिक प्रदेश असल्याने या उमेदवारांनी नियुक्ती आदेश व अनुभवाचे दाखले हे मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेत आणावे व त्यावर संबंधित अधिकारी/मुख्याध्यापकाची सही व शिक्का आणणे अनिवार्य आहे. प्रवेश अर्ज पडताळणी वेळी वरील मूळ व साक्षांकित प्रमाणपत्राआधारे आपल्या प्रवेश अर्जातील माहितीची सत्यता पडताळून पाहण्यात येईल. त्यामुळे उपरोक्त आवश्यक ती कागदपत्रे तुमच्या जवळ नसल्यास,

ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यात येतील,

१३) प्रवेश अर्जातील कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर पुढील प्रवेश सूचना विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध

करण्यात येतील. त्या सूचना पाहणे व त्याप्रमाणे कार्यवाही करणे ही उमेदवारांची जबाबदारी राहील.

१४) अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी विद्यापीठ संकेतस्थळाला भेट देत राहावी व अधिक माहितीसाठी बी. एड. माहितीपुस्तिका वाचावी.

१५) कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर, आपल्याला पुढीलपैकी दोन अध्यापन पद्धर्तीची निवड करावयाची आहे, ती समिती सदस्यांना सांगावयाची आहे. त्यांनी अध्यापन पद्धतीची योग्य नोंद केलेली आहे का ? ह्याची खातरजमा करण्याची जबाबदारी प्रवेशार्थीची असेल.


१) EDU 405 : मराठी

२) EDU 406 : हिंदी

३) EDU 407 : इंग्रजी

४) EDU 408 : संस्कृत

५) EDU 409 : इतिहास

६) EDU 410 : भूगोल

७) EDU 411 : गणित

८) EDU 412 : विज्ञान

९) EDU 413 : अर्थशास्त्र

१०) EDU 414 : हिशोबशास्त्र


संचालक,

शिक्षणशास्त्र विद्याशाखा

संचालक,

विद्यार्थी सेवा विभाग


सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ प्रवेश कागदपत्र पडताळणी अधिकार पत्राबाबत (Authority Letter)

सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ प्रवेशासाठीची कागदपत्र पडताळणी विभागीय केंद्रावर दि. ६ ते ९ नोव्हें २०२४ पासून सुरु होणार आहे. बी.एड. प्रवेशासाठी अर्ज करणारे जे प्रवेशेच्छुक अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी वैद्यकीय, तांत्रिक व शासकीय कारणांमुळे उपस्थित राहू शकणार नाही, त्या अर्जदारांनी सोबत जोडलेले अधिकार पत्र (Authority Letter) देऊन, अधिकार प्राप्त व्यक्तीला मूळ कागदपत्र, झेरॉक्स संच व स्वतःचे मूळ आधार कार्ड घेऊन, आपल्या जिल्ह्यांच्या कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या तारखेला संबंधित विभागीय केंद्रावर उपस्थित राहता येईल.

मात्र कागदपत्र पडताळणी बाबतची सर्व जबाबदारी ही संबंधित उमेदवाराचीच असेल याची नोंद घ्यावी.


संचालक,

विद्यार्थी सेवा विभाग

य.च.म.प.वि. नाशिक

संचालक,

शिक्षणशास्त्र विद्याशाखा






सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ च्या प्रवेश कागदपत्र पडताळणीच्या वेळी परिशिष्ट- ४ सादर करणेबाबत.


सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ साठीची कागदपत्र पडताळणी ही विभागीय केंद्रावर जिल्हानिहाय आयोजित करण्यात आलेली आहे. बी.एड. प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्र पडताळणीस येतांना सर्व उमेदवारांनी बी.एड. माहितीपुस्तिका २०२४-२६ पान क्र. ३१ वरील 'परिशिष्ट ४' हे संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी व शिक्यानिशी भरून आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय कागदपत्र पडताळणी व सेवा पडताळणी केली जाणार नाही. त्या संदर्भात कोणत्याही उमेदवारास मुदतवाढ दिली जाणार नाही.

कृपया याची नोंद घ्यावी.


संचालक,

विद्यार्थी सेवा विभाग

संचालक,

शिक्षणशास्त्र विद्याशाखा








यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सेवांतर्गत बीएड प्रवेश प्रक्रिया 2024 2026 विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर गुणवत्ता यादी  पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. ओपन झालेल्या विंडो मधून आपल्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड करा.


https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/frmDistrictWiseMeritList.aspx?did=389





यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नॅक मानांकित 'अ' श्रेणी)

'ज्ञानगंगोत्री', गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक ४२२२२२


एन.सी.टी.ई. मान्यताप्राप्त शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.) (P80)

प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष २०२४-२६


प्रवेश-पात्रतेच्या अटी

(१) डी.एड./डी.टी.एड./डी.एल.एड. डिप्लोमा पूर्ण केलेले आणि महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.

(२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुण व राखीव प्रवर्गासाठी ४५% गुण.

प्रवेश-अर्ज व माहितीपुस्तिका ऑनलाईन विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- व राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- ऑनलाईन भरून अर्ज ऑनलाईन सादर करावा.


दिलीप भरड 

कुलसचिव


प्रवेश प्रक्रिया सुरू

अंतिम दिनांकः १८ ते २२ ऑक्टोबर २०२४ (रात्री ११.५९ मि.) अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी.


• http://ycmou.digitaluniversity.ac


http://www.ycmou.ac.in


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत b.ed अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.


ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची लिंक.

https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/HomePage.aspx?did=213



संपूर्ण माहितीपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.

Download



सेवांतर्गत b.ed नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू झाली.

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत b.ed अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.


ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची लिंक.

https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/HomePage.aspx?did=213


वरील लिंक ला टच करून आपण यशवंतराव चव्हाण महा.राष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डीएड प्रवेशासाठी आपली ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.


• ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेदवारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.


ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास खालीलप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.


ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतः चा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल. तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.


ऑनलाईन प्रवेशअर्ज पूर्ण भरण्यास आपल्याला कधीही काही अडचण अथवा अडथळा आपणास उद्भवल्यास आपण आमच्याशी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या घ्यावे.



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

8 Comments

  1. Ajun registration cha option nahi ki

    ReplyDelete
  2. B Ed nivad yadi2023 kdhi yenar ahe

    ReplyDelete
  3. सेवांतर्गत शिक्षक बीएड ऍडमिशन कधी सुरू होणार आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. वेळ आहे अजून.. सुरू झाले की टाकतो..

      Delete
  4. पडताळणी केव्हा आहे.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.