राज्यात अजूनही 293 शाळा 0 पटसंख्या असलेल्या दहा पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या देखील ७४८१ एवढी राज्य प्रकल्प संचालक यांची माहिती

 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे राज्य प्रकल्प संचालक यांनी दिनांक 16 जून 2023 रोजी शिक्षण आयुक्तांना परिपत्रक पाठविले आहे त्यानुसार सन 2022 23 यु-डायस प्लस ऑनलाइन प्रणालीमध्ये शून्य व कमी पटसंख्यांच्या शाळांची माहिती दिली आहे.

भारत सरकार शिक्षा मंत्रालय यांचेकडे राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती यु-डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. यु-डायस प्लस माहितीच्या आधारे भारत सरकारकडून विविध योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी, PGI, SEQI निर्देशांक काढण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो. तथापि, सदरची माहिती वस्तुनिष्ठ व अचूक असणे आवश्यक आहे त्याकरिता राज्याच्या शैक्षणिक निर्देशांक वाढण्यासाठी मदत 

होईल. दि. १४ जून २०२३ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या १,०८,७८७ शाळांपैकी शून्य पटसंख्या असणाऱ्या २९३ शाळांनी यु-डायस प्रणालीतील माहिती अद्यापही भरलेली नाही. यु-डायस प्लस प्रणाली माहितीनुसार १ ते १० पटाच्या शाळांची संख्या खालील प्रमाणे दिसुन येत आहे.



वरील तक्त्यानुसार ० ते १० पट संख्या असलेल्या शासकीय ५७९९ आहे. यापैकी जिल्हा परिषद ५६८३. मनापा ५५, नपा ४२, खाजगी अनुदानित २२७, यापैकी समाज कल्याण अनुदानित १७४, आदिवासी खाजगी अनुदानित ३९. खाजगी विनाअनुदानित" १३५९, यापैकी स्वयंअर्थसहाय्यिक १०६३, खाजगी विनाअनुदानित २३३, समाज कल्याण विना अनुदानित ५७. मान्यता नसलेल्या १६ आहेत.


यु-डायस प्लस मधील राज्यातील सर्व शून्य पटाच्या व कमी पटाच्या शाळां मधील विद्यार्थी संख्येची खात्री करणे गरजेचे आहे. ज्या शाळा शून्य पटाच्या असून आणि त्या बंद झालेल्या आहेत अशा शाळा यु-डायसच्या डेटाबेस मधून कमी करणे आवश्यक आहे. ज्या शाळांचा पट एक आहे, अशा शाळांचीही पडताळणी करण्यात यावी, त्यामधील एक विद्यार्थी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदविलेला शाळांना प्रत्यक्षात पर्यवेक्षीय यंत्रणेद्वारे Physical Verification करण्यात यावे व त्या विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती घेण्यात यावी, यामध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, तो विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये नोंदविल्या आहे किंवा कसे, विद्यार्थ्यास शासकीय योजनेच्या लाभ देण्यात येत आहे किंवा नाही याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल शासनास व या कार्यालयास जून, २०२३ अखेरपर्यंत सादर करण्यात यावा.



वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.