वर्ग पाचवी वर्ग आठवीसाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करते सदर शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना विशिष्ट शिष्यवृत्ती दिली जाते.
वर्ग पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी सातवी आठवी या तीन वर्गात शिष्यवृत्ती मिळते तर वर्ग आठवी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना नववी व दहावी या वर्गात शिष्यवृत्ती मिळते.
ही शिष्यवृत्ती तब्बल तेरा वर्षा अगोदर ठरवून देण्यात आल्यानुसार वर्ग पाचवीला 250 ₹ तर वर्ग आठवीला जास्तीत जास्त 1000 ₹ एवढी शिष्यवृत्ती देण्यात येत होती या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने दिनांक 13 जून 2023 रोजी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता इयत्ता पाचवी वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्याला 5000 ₹ एवढी तर वर्ग आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्याला वार्षिक 7500 ₹ एवढी शिष्यवृत्ती सन 2023 24 या शैक्षणिक वर्षापासून मिळणार आहे.
जर या अगोदर मिळणाऱ्या शिष्यवृत्ती आणि आता मिळणारी शिष्यवृत्ती यात आपण तुलना केली तर वर्ग पाचवीला मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये जवळपास वीस पट वाढ करण्यात आली आहे.
तर वर्ग आठवीला मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये 15 पट वाढ करण्यात आली आहे.
त्याचबरोबर वीस हजार रुपये उत्पन्न मर्यादा देखील काढून टाकण्यात आलेली आहे.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments