विधानपरिषद तारांकित प्रश्न क्रमांक - १९१६१ - राज्यातील अनेक जिल्हयात शालेय पोषण आहार नियमित मिळत नसल्याबाबत.

 श्री. राजेश राठोड, व इतर विधान परिषद सदस्य यांनी खालीलप्रमाणे तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे.


१) राज्यात जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमधील ८ वी पर्यंतचे ८८ लाखांहून अधिक विद्यार्थी पोषण आहार नियमित मिळत नसल्याने शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याचे माहे मार्च - एप्रिल २०२३ च्या तिसऱ्या आठवडयात वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,


२) असल्यास, पोषण आहाराचा पुरवठा मागील दोन महिन्यांपासून बंद असल्याने शाळांमध्ये खिचडी शिजलेली नाही त्यामुळे गोरगरीब मुलांना उपाशी रहावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,


३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने पोषण आहाराची निविदा प्रक्रिया तातडीने राबवून सदरील शाळांमध्ये पोषण आहार सुरू करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,


४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?


वरील प्रश्नाचे उत्तर पूरक टिप्पणीसह शासनास दि. २९ जून, २०२३ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत शासनास पाठविण्यात यावे.


(प्रमोद पाटील)


अवर सचिव, महाराष्ट्र शासन



वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.