बदली अपडेट - सर्वच बदल्या दोन वर्ष लांबणीवर?

 मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयातून दिनांक 20 जून 2023 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने बदल्या व पदस्थापना देणेबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


प्रस्तुत वर्ष हे निवडणूकांचे वर्ष असल्याने व भारत निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम / व्हीव्हीपॅट संदर्भात नवीननवीन सूचना/ निर्देश प्राप्त होत असल्याने तसेच ईव्हीएम / व्हीव्हीपॅट हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने हे संच हाताळणान्या तसेच त्यासंदर्भात काम करणाऱ्या वर्ग-३/वर्ग-४ च्या कर्मचान्यांच्या अपवादात्मक परिस्थीती वगळून बदल्या करणे टाळावे.


त्याचप्रमाणे निवडणूक संचालनाचे यापूर्वीच्या निवडणूकांचे उत्कृष्टरित्या काम केलेले वर्ग-३/वर्ग-४ च्या आपल्या कार्यालयातील कर्मचारीवृंदांनाही सन २०२४ च्या निवडणूकीसाठी नेमण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.


आपला, ( श्रीकांत देशपांडे ) अप्पर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य.


अर्थात यावर्षीच्या बदल्या साठी 30 जून 2023 पर्यंत शासन निर्णयाद्वारे मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यानुसार सर्व विभागांमध्ये बदलांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे किंवा अंतिम टप्प्यात आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल 2022 ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 2023 मध्ये बदल्या होण्यासाठी नवीन सुधारित बदली धोरण ग्रामविकास विभागाने आतापर्यंत शासन निर्णयाद्वारे जाहीर करणे अपेक्षित होते परंतु अद्याप तसा शासन निर्णय निर्गमित झाला नाही.

मुख्य निवडणूक अधिकारी ज्यांच्या सदर पत्रामुळे शैक्षणिक सत्र 2023 मधील बदल्या होतील की नाही याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.




शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.