जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 9 जून 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2022 मध्ये विशेष संवर्ग भाग एक चा लाभ घेतलेल्या शिक्षकांची तपासणी करून अहवाल देणे बाबत अधिष्ठाता जे जे मेडिकल कॉलेज मुंबई यांना पुढील प्रमाणे विनंती केली आहे.
2022 च्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत जालना जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत एकूण 170 शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग एक मधून बदलीतून सूट अथवा बदलीचा लाभ घेतलेला आहे. सदरील शिक्षकाचे कागदपत्रांची जि.प.स्तराक पडताळणी करण्यात आलेले आहे. तथापी उपरोक्त संदर्भ क्रमांक (03) ले (07) अन्वये बदली प्रक्रियेत अनेक शिक्षकांनी दिव्यांग व आजाराबाबतचे खोटे प्रमाणपत्र सादर करून बदली करून घेतलेली असून संबंधित शिक्षकांचे दिव्यांगा आजाराबाबत कागदपत्रांची पडताळणी करून जाणीवपूर्वक खोटी माहिती भरलेल्या शिक्षकांविरुध्द कारवाई करणे बाबत तक्रारी प्राप्त आहेत.
शासन निर्णयान्वये संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात आलेल्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2022 मध्ये उक्त नमूद विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मधून (170) शिक्षकांनी लाभ घेतलेला आहे. त्या बाबतचा शिक्षकांचा तपशिल या पत्रासोबत देण्यात येत असून संदर्भिय मा.न्यायालयाचे निर्णयानुसार संबंधित शिक्षकांची/पाल्याची जोडीदाराची तपासणी आपल्यास्तरावर करून संबंधिताने सादर केलेले कागदपत्र व संबंधित दिव्यांग (प्रमाणपत्राची टक्केवारी) आजारामध्ये मोडतो किंवा कसे याबाबत अहवाल या कार्यालयास मिळाल्यास सदर प्रकरणी उचित कार्यवाही करणे सुकर होईल. त्या अनुषंगाने संबंधित शिक्षकांना आपणाकडे तपासणीकरिता पाठविण्यासाठी कृपया दिनांक व वेळ निश्चित करून कळविण्यावे ही विनंती. सोबत उक्त नमूद विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 मधील शिक्षकाची यादी (शिक्षक संख्या 170).
वर्षा मीना (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना
वरील परिपत्रक संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments