दहावी बारावी बोर्डाची पुरवणी परीक्षा अपडेट - जुलै-ऑगस्ट २०२३ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२वी) पुरवणी परीक्षा वेळापत्रक

 जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे. नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणान्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) पुरवणी परीक्षेची लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12)

सर्वसाधारण व दिलक्षी विषय

मंगळवार, दि. १८ जुलै २००३ ते

मंगळवार दि. ०८ ऑगस्ट, २०२३


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी)

व्यवसाय अभ्यासक्रम

मंगळवार, दि. १८ जुलै २०२३

शनिवार, दि. ०५ ऑगस्ट, २०२३


माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १०वी)

मंगळवार, दि. १८ जुलै २०२३ मंगळवार, दि. ०१ ऑगस्ट, २०२३.


इ. १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार दि. १८ जुलै २०२३ ते मंगळवार, दि. ०१ ऑगस्ट, २०२३ व इ. १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा गंगळवार, दि. १८ जुलै, २०२३ ते शनिवार, दि. ०५ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर ०६ जून २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरू नये.


उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.


दिनांक : ०६ जून २०२३


(अनुराधा ओक) सचिव, राज्यमंडळ, पुणे ४.



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.