माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेतील निकालापूर्वीच्या व निकालानंतरच्या दुरुस्त्यांच्या सुधारित दंडात्मक शुल्काबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिनांक 9 जून 2023 रोजी पुढील प्रमाणे सुधारणा केल्या आहेत.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेतील निकालापूर्वीच्या व निकालानंतरच्या दुरुस्ती प्रकरणी सुधारित दंडात्मक शुल्काबाबतचा विषय दिनांक १४/१०/२०२२ रोजीच्या कार्यकारी परिषदेसमोर सादर करण्यात आला असता त्याबाबत खालीलप्रमाणे ठराव संमत झाला आहे.. विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाइन प्रिलिस्टमधील विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नांव, आडनाव, आईचे नांव, विषय, माध्यम, विषय सूट, इत्यादीच्या दुरुस्त्या मोठया प्रमाणात मंडळास प्राप्त होतात. राज्य मंडळाचे पत्र क. रा.मं./ परीक्षा-३/८३४२ दि. २७/१२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार विहीत शुल्क आकारून सदरच्या दुरुस्त्या करुन देण्यात येतात. याबाबत नाशिक व औरंगाबाद विभागीय मंडळाकडून दुरुस्ती शुल्कात वाढ करणेबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला होता. सदर दुरुस्तीच्या प्रस्तावांसाठी खालीलप्रमाणे दुरुस्ती शुल्कात वाढ करणेबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
निकालापूर्वीच्या व निकालानंतरच्या दुरुस्तीसाठी दुरस्ती शुल्क खालीलप्रमाणे आहे. - अ) निकालापूर्वीच्या दुरुस्त्यांबाबत
दुरुस्तीबाबतचा तपशील
दुरूस्ती शुल्क
नावातील दुरुस्ती (फक्त नाव / वडिलांचे नांव / आडनाव यापैकी काहीही एक)
रु. २००/- प्रती दुरुस्ती
संपूर्ण नावातील दुरुस्ती (नांव, आडनाव, वडिलांचे नांव
आईच्या नावातील दुरूस्ती
रू.२००/- प्रती विदयार्थी
आवेदनपत्रातील प्रत्येक दुरूस्तीसाठी (विषय / माध्यम वगळून) जन्मठिकाण / जन्म दिनांक
रु. २००/- प्रती विदयार्थी
विषय दुरुस्ती / विषय सूट दुरुस्ती
रु. २००/- प्रती दुरुस्ती
संपूर्ण विषयांची दुरुस्ती
रु. १०००/- प्रती विदयार्थी
संपूर्ण विषयांच्या माध्यमाची दुरुस्ती
रु. १०००/- प्रती विदयार्थी
आवेदनपत्र चुकीचे पाठविणे एका विषयाच्या माध्यमातील दुरुस्ती
रु. २००/- प्रती विषय
प्रिलिस्ट विहीत मुदतीनंतर पाठविणे
२००/- प्रति दिन
तरी उपरोक्त ठरावाची नोंद घेऊन जुलै ऑगस्ट २०२३ च्या परीक्षेपासून प्रस्तावित दुरुस्ती शुल्कानुसार शुल्क आकारुनच दुरुस्तीचे प्रस्ताव स्विकारण्यात यावे व यथानियम कार्यवाही करावी.
(अनुराधा ओक)
सचिव
राज्य मंडळ, पुणे- ४
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments