डीसीपीएस किंवा एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना देखील अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय करणे बाबत वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांचे संचालनालय लेखा व कोषागारे यांना निर्देश.
डी सी पी एस/ एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना देखील मिळणार अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ!
संचालक राज्य अभिलेख हे देखभाल अभिकरण व संचालनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाला नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजनेचे सभासद सेवानिवृत्त, राजीनामा, नोकरी सोडल्यास किंवा निधन झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा रजा सुधार नियम 2016 मधील तरतुदीनुसार अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय आहे किंवा नाही असे मार्गदर्शन वित्त विभागाला मागितले असता महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 14 जून 2023 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करून मार्गदर्शन केले आहे.
दिनांक ०१ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व विहीत मार्गाने सेवा समाप्त (नियत वर्यामान सेवानिवृत्ती मृत्यू इ.) झालेल्या राज्य शासकीय कर्मचान्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत शासन स्तरावरून उचित आदेश होण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. २. याबाबत नमूद करण्यात येते की, संदर्भ क्र. २ येथे नमूद शासन निर्णयातील परिच्छेद ५(ब) येथे स्पष्टपणे नमूद केले आहे की, "१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्ती होणान्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू ठरेल. मात्र, सध्या अस्तित्त्वात असलेली निवृत्तिवेतन योजना (म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४) आणि सध्या अस्तित्वात असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना त्यांना लागू होणार नाही." ३. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासकीय संकेत नियुक्ती होणाऱ्या कर्मचान्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ लागू होणार नसल्याबाबत कोणतेही आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सदर कर्मचान्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ हे जसेच्या तसे लागू आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.
(अनिता लाड) अवर सचिव, वित्त विभाग
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments