RTE Admission 2023-24 | RTE च्या प्रवेशासाठी RTE च्या अधिकृत वेबसाईटने पालकांसाठी काही महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. पालकांनी खाली दिलेल्या महत्वाच्या सूचनांचे अनुसरण करावे.
RTE Admission 2023-24 | आरटीई महाराष्ट्र प्रवेश 2023-24 हे महाराष्ट्रातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील खाजगी शाळांमधील 25% जागांवर प्रवेश आहे. महाराष्ट्र RTE Admission 2023-24 हे शिक्षण हक्क कायद्यानुसार आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्रात आरटीई कायद्याची अंमलबजावणी आणि त्यानंतरच्या आरटीई प्रवेश महाराष्ट्रात पाहतो. त्यामुळे अर्जाचा फॉर्म, तारीख, RTE प्रवेश 2023-24 महाराष्ट्र लॉटरी निकाल अधिकृत वेबसाइट
rte25admission.maharashtra.gov.in
आणि विभागाच्या इतर पोर्टलवर घोषित केला जातो.
RTE Admission 2023-24 | आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी याबाबत पालकांनी कोणतीही भीती /संभ्रम बाळगू नये. तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत ( लॉटरी )द्वारे निवड झाली आहे अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल.
RTE ADMISSION 2023-24
आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 13 एप्रिल 2023 पासून 08 मे 2023 पर्यंत आहे.
निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढावी तसेच हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.
ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा
अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.
निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments