विस्तार अधिकारी शिक्षण या पदाची दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी ची प्रारूप सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत शिक्षण आयुक्तालयाचे निर्देश

 विस्तार अधिकारी शिक्षण या पदाची दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी ची प्रारूप सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत शिक्षण आयुक्तालयाचे निर्देश.


शिक्षण आयुक्तालयातून निर्गमित दिनांक 25 मे 2023 रोजी च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा संवर्गाकरिता जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग तीन श्रेणी दोन शैक्षणिक संवर्गातील विस्तार अधिकारी शिक्षण या पदाची दिनांक एक जानेवारी 2023 रोजी ची तात्पुरती सेवाजेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन अधिसूचना संदर्भ क्र. १, दि.२८.१२.२०२३ अन्वये प्रसिध्द महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) संवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदाचे सेवाप्रवेश नियम व शासन पत्र दि. १६.०१.२०२३ अन्वये प्राप्त निर्देशानुसार या कार्यालयाचे पत्र संदर्भ क्र.३ दि. १७.०१.२०२३ अन्वये जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-३ (शैक्षणिक) श्रेणी २ संवर्गातील विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावरील कार्यतर महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) संवर्गामध्ये पदोन्नतीसाठी विकल्प दिलेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची (तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची तयार करण्यासाठी विहित प्रपत्रात क्षेत्रीयस्तरावरुन माहिती मागविण्यात आली आहे.


जिल्हा परिषदांकडून संदर्भ क्र.४ अन्वये प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) संवर्गामध्ये पदोन्नतीसाठी विकल्प दिलेल्या जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ श्रेणी-२ (शिक्षण) संवर्गातील विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावरील जिल्हा परिषद कर्मचा-यांची राज्यस्तरीय तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची तयार करण्यात आली आहे. सदर सेवाज्येष्ठता सूची क्षेत्रीयस्तरावर प्रसिद्ध करण्यात यावी.


सदर सेवाज्येष्ठता सूची जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ श्रेणी-२ (शिक्षण) संवर्गातील विस्तार अधिकारी (शिक्षण) पदावरील सर्व कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून निदर्शनास आणलेबाबत दिनांकित स्वाक्षरीची पोहच सोबतच्या नमुन्यात घेवून आपल्या कार्यालयामध्ये दप्तरी ठेवून एक छायांकित प्रत या कार्यालयास पाठविण्यात यावी.


सदर ज्येष्ठता सूचीबाबत हरकती / आक्षेप अथवा सूचना आपलेकडे दि. १५.०६.२०२३ पर्यंत सादर करण्याचे सर्व संबंधितांना सुचना देण्यात याव्यात. आपले कार्यालयास दि. १५.०६.२०२३ नंतर प्राप्त हरकती/ आक्षेप / सूचना विचारात घेण्यात येवू नये. आपलेकडेस मुदतीत प्राप्त हरकती, आक्षेप, सूचनांची पडताळणी करुन आपल्या अभिप्रायासह व आवश्यक तेथे पुरावापत्रांसह हरकती / आक्षेप / सूचना दिनांक ३०.०६.२०२३ पर्यंत या कार्यालयास सादर करण्यात याव्यात. सदर हरकती / आक्षेप / सूचना व त्याबाबतचा सविस्तर तपशिल सोबत जोडलेल्या नमुन्यातच आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी.


आपल्या कार्यालयामार्फत विहित मुदतीत प्राप्त झालेले आक्षेप, सुचना व हरकतींचाच या कार्यालयाच्यास्तरावर विचार करण्यात येईल. या कार्यालयास परस्पर प्राप्त झालेल्या आक्षेप, हरकती, सुचनांबाबत कार्यवाही करता येणार नाही. ही बाब सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी.


विहित मुदतीत दि.३०.०६.२०२३ पर्यंत आपल्या कार्यालयाकडून काही एक हरकती, आक्षेप सूचना आपल्या अभिप्रायासह प्राप्त न झाल्यास, आपल्या कार्यालयाच्या काहीही हरकत, आक्षेप, सूचना नाहीत, असे समजून विषयांकित नमुद संवर्गाची दि.०१.०१.२०२३ रोजीची सेवाज्येष्ठता सूची अंतीम करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.


आपल्याकडून प्राप्त माहिती, सुचना, आक्षेप तसेच संबंधितांचे प्राप्त आक्षेप / हरकती संदर्भातील अभिप्रायानुसारच उपरोक्त संवर्गाची सेवाज्येष्ठता सूची अंतीम करण्यात येणार असल्याने, वरील प्रारुप सेवाज्येष्ठता सुचीचे बाबतीत काही एक सूचना, हरकती सादर करण्यासाठी तसेच भविष्यात कोणतीही प्रशासकीय बाब अथवा न्यायालयीन प्रकरण उद्भवणार नाही, याची दक्षता घेवून खालील सूचनांचे पालन करण्यात यावे.


. सदर सेवाज्येष्ठता सूचीत ज्या रकान्यांमधील माहिती अपूर्ण अथवा त्रुटी असतील त्या सर्व रकान्यांमधील आवश्यकती संपूर्ण माहिती सादर करावी.


सेवाज्येष्ठता सूचीमधील कर्मचा-यांचा जात प्रवर्ग बाबत खातरजमा करण्यात यावी.


जिल्हा परिषद अधिनस्त कार्यरत महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) संवर्गामध्ये पदोन्नतीसाठी विकल्प दिलेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांची नावे राज्यस्तरीय सेवाज्येष्ठतासूचीमध्ये समाविष्ठ न झाल्यास भविष्यात काही प्रशासकीय बाब उद्भवल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदांची राहील.


ग्राम विकास विभाग, शासन अधिसूचना क्र. मविसे. १०१६/प्र.क्र. १९/२०१६/आस्था-३, दि. १८.०९.२०१८ मधील नियम ४ (६) (४) मधील तरतूदीनुसार आपल्या अधिनस्त कर्मचा-यांच्या विकल्पाबाबत पडताळणी करण्यात येवून संबंधित कर्मचा-यांनी महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब संवर्गामध्ये पदोन्नतीसाठी विकल्प दिला नसल्याची, संबंधित विभागीय आयुक्त यांचेमार्फत प्रसिध्द सेवाज्येष्ठतासूचीमध्ये नाव समाविष्ट नसल्याची संबंधीत जिल्हा परिषदेने खात्री करून घेणे आवश्यक आहे.


या कार्यालयाचे संदर्भ क्र. ३ दि. १७.०१.२०२३ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार सादर केलेल्या माहितीनुसार दिव्यांग कर्मचा-यांचे बाबत दिव्यांग प्रवर्गाची सेवाज्येष्ठतासूची तयार करणेसाठी या कार्यालयाचे पत्र क्र.२८७५, दि.२२.०७.२०२१ मध्ये सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग कर्मचा-यांची विवरण पत्र अ, ब व क नुसार दिव्यांग कर्मचा-यांची माहिती पुरावापत्रासह (नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, दिव्यांग प्रमाणपत्र कार्यालयास सादर केल्याबाबतचे पुरावापत्र ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांग भत्ता/ वाहतूक भत्ता मंजूरी आदेश, व्यवसाय कर सूट आदेश प्रत इ.) सादर करण्यात यावेत.


प्रस्तुत सेवाज्येष्ठता सूचीबाबत भविष्यात (नाव समाविष्ठ नसणे, नियुक्ती दिनांक नोंदी, जिल्हा स्थानांतर, विकल्पाबाबत कोणतीही प्रशासकीय बाब उद्भवल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबतदारी संबंधित जिल्हा परिषदांची राहील, याची नोंद घेण्यात यावी.


आपलेकडून विहित मुदतीत प्राप्त माहिती / सुचना तसेच संबंधितांच्या प्राप्त आक्षेप / हरकती संदर्भातील आपल्या अभिप्रायानुसारच उपरोक्त संवर्गाची दि.०१.०१.२०२३ रोजीची ज्येष्ठतासूची अंतीम करण्यात येईल. सदर विषयांकित दि.०१.०१.२०२३ रोजीची तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची शासन अधिसूचना दि. २८.१२.२०२२ अन्वये प्रसिध्द महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब, उपशिक्षणाधिकारी पदाचे सेवाप्रवेश नियम २०२२ संदर्भात मा. महाराष्ट्र शासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे मुळ अर्ज क्र. २२७/ २०२३ व मुळ अर्ज क्र. २९८ / २०२३ तसेच, मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ नागपूर येथे मुळ अर्ज क्र.२७७/२०२३ दाखल असून त्यांचे अधिनस्त राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.


सहपत्र :


- १. तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची (प्र.क्र. १ ते १७ सह)


२. हरकतीसाठीचा नमुना.


३. जिल्हा परिषदेने ठेवावयाचा पोहच नमुना




वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.