महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 24 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या केंद्रप्रमुख पदोन्नती करिता मार्गदर्शन मिळण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना शासन आदेशान्वये पुढील प्रमाणे मार्गदर्शन केले आहे.
केंद्रप्रमुखांच्या पदभरतीच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश लक्षात घेऊन आपणांस कळविण्यात येते की, केंद्रप्रमुख (पदभरती करतांना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दि. ०१.१२.२०२२ च्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुखांच्या पदभरतीचे प्रमाण ५०% पदोन्नतीने व ५०% मर्यादीत स्पर्धा परिक्षेप्रमाणे करण्यात यावी. मात्र ग्रामविकास विभागातील दि. १०.०६.२०१४ ची अधिसुचना अद्याप रदद वा अधिक्रमित केली नसल्यामुळे केंद्र प्रमुख पदभरती करतांना विषय निहाय विभागणी ही सदर अधिसुचनेमध्ये विहित केल्याप्रमाणे करण्यात यावी.
आपल्या संदर्भाधिन पत्रातील मुददा क्र. ५ च्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, शासन अधिसुचना दि. १० जून २०१४ मध्ये ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारांमधून सेवाजेष्ठतेच्या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येतील असे नमुद आहे त्यामुळे विशिष्ट विषयात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून सेवेचा उल्लेख अधिसूचनेत नाही त्यामुळे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणुन कोणत्याही विषयात तीन वर्षे अखंड सेवा केल्यानंतर सध्या जो पदवीचा विषय आहे त्या विषयात संबंधित प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांस केंद्र प्रमुख म्हणुन पदोन्नती दयावी.
या शासन परिपत्रकां अन्वय ग्रामविकास विभागाने केंद्रप्रमुख पदोन्नती देत असताना पदवीधर प्राथमिक शिक्षक सर्व विषय यांची सेवा जेष्ठता यादी तयार करून त्यानुसार केंद्रप्रमुख पदोन्नती देण्यात यावी असे म्हटले आहे.
पदवीच्या विषयानुसार किंवा विषय शिक्षक यामधील कोणत्या विषयाला किती टक्के पदोन्नती मध्ये आरक्षण आहे असे नाही. म्हणजेच पदोन्नती देताना विषय लक्षात न घेता सरसकट सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी अशा पद्धतीचे मार्गदर्शन ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments