वरिष्ठ श्रेणी किंवा निवड श्रेणीसाठी 21 दिवसांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाची गरज नाही शिक्षण उपसंचालक यांचे परिपत्रक.
विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांनी दिनांक 12 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार वरिष्ठ श्रेणी अथवा निवड केली बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
उपरोक्त शासन निर्णयामध्ये माध्यमिक शिक्षक / कमवि / उमावि शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने खालील प्रमाणे तरतूद आहे.
मुद्या क्र.४ वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षण शासन स्तरावरुन आयोजित न केल्यामुळे वरिष्ठ व निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत सदर दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र दिनांकापासून लाभ देय राहिल.
उपरोक्त तरतुद विचारात घेवून माध्यमिक / कमवि शिक्षक यांच्या वेतन निश्चितीबाबत कार्यवाही करावी.
अर्थात आता माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मधील शिक्षकांना ऑनलाईन 21 दिवसाच्या प्रशिक्षण करण्याची गरज नाही जर ते वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी इतर अटी पूर्ण करत असतील तर त्यांनी जर फक्त दहा दिवसाचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले असेल तर त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा निवड श्रेणी लागू होईल.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments