वरिष्ठ वेतनश्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नाव नोंदणी 2023 करा आता आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून टप्प्याटप्प्याने कशी करावी.
वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम पुढील लिंक वर क्लिक करा किंवा पुढील लिंक कॉपी करून आपल्या ब्राउझर मध्ये पेस्ट करून ओपन करा.
https://training.scertmaha.ac.in
आपणास आपल्या मोबाईलवर अथवा पीसीवर पुढील प्रमाणे विंडो ओपन झालेली दिसेल.
वरील विंडो मधील शिक्षक प्रशिक्षण 2023 24 वर क्लिक करा.
त्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन झालेली दिसेल.
वरील विंडो मधील आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी नोंदणी करायची असेल तर वरील नाहीतर निवड श्रेणीसाठी नोंदणी करायची असेल तर खालील निळ्या डब्यावर क्लिक करा.
त्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन झालेली दिसेल.
वरील विंडोमध्ये आपला अचूक असा शालार्थ आयडी नोंदवा त्यानंतर आपली जन्मतारीख नोंदवा व आपला मोबाईल नंबर निळ्या रंगाच्या खालील रजिस्टर नोंदणी करण्यासाठी क्लिक करा वर क्लिक करा. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो पुढील ओपन झालेल्या विंडोमध्ये अचूक नोंदवून Verify बटन वर क्लिक करा.
त्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल ज्यामध्ये टप्प्याटप्प्याने असलेली माहिती तपासून घ्या व नसलेली माहिती भरा.
सदर विंडोमध्ये आपले नाव जन्मतारीख आपल्या शाळेचे नाव यु-डायस नंबर इत्यादी माहिती आपोआप येऊन जाईल.
त्याखाली आपले संबोधन लिंग देवनागरी लिपी मध्ये आपले नाव व ईमेल आयडी तसेच आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रते संबंधी दिलेल्या योग्य बॉक्स वर पुढील प्रमाणे टिक करा.
त्यानंतर आपल्याला कोणत्या गटाची प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे त्या बॉक्सवर क्लिक करा.
योग्य त्या बॉक्स वर क्लिक केल्यानंतर तो बॉक्स निळ्या रंगांमध्ये आपल्याला दिसेल.
वरील विंडोमध्ये आपण सेव जतन करा या निळ्या बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे ईमेल आयडी व्हेरिफिकेशन साठी विंडो ओपन होईल ज्यामध्ये आपल्या रजिस्टर केलेल्या ई-मेल वर एक ओटीपी आलेला असेल.
तुमच्या मोबाईल मध्ये जर ई-मेल आयडी सेव असेल तर तुमच्या मेल बॉक्समध्ये जाऊन ओटीपी पहा व तो ओटीपी पुढील विंडोमध्ये नोंदवा.
वरील विंडोमध्ये अचूक असा ओटीपी नोंदवल्यानंतर आपला ईमेल आयडी व्हेरिफाय होऊन जाईल व पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
वरील व खालील स्क्रीन शॉट मध्ये दिल्याप्रमाणे आपली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. माहिती बरोबर असल्यास पुढील प्रक्रिया करावी.
जर जर माहिती काही तफावत असेल तर एडिट माहितीत बदल करा यावर क्लिक करा व माहिती दुरुस्त करा.
त्याच पिल्लू मध्ये सर्वात खाली मला वरील सूचना मान्य आहेत यावरील एक बॉक्स वर टिक करून ते ट्रेनिंग फीज प्रशिक्षण शुल्क भरा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
वरील विंडो मधून पेमेंट गेटवे म्हणजेच Billdesk किंवा Razor Pay यापैकी एक निवडा पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
वरील प्रमाणे ओपन झालेल्या विंडोमध्ये सर्वात शेवटी Pay Now पेमेंट करा वर क्लिक करा आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल पुढील विंडोमध्ये आपल्याला पेमेंट क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड करायचे आहे की इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआय किंवा क्यू आर कोड किंवा एनईएफटी आरटीजीएस यापैकी एक निवडून पैसे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
पेमेंट यशस्वीरीत्या झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे Receipt म्हणजेच पावती मिळेल पुढील इमेज चा स्क्रीन शॉट काढून ठेवण्यास विसरू नका.
त्यानंतर कम्प्लीट रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी पूर्ण करा वर क्लिक करून रिसिप्ट वर असलेली माहिती यापुढील विंडोमध्ये टाकून आपली नोंदणी पूर्ण करा.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
1 Comments
Thank you🙏
ReplyDelete