वरिष्ठ वेतन श्रेणी/निवड श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया सुरू अधिकृत लिंक.

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाइन ट्रेनिंग साठी नोंदणी सुरू महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपण सदर 21 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी आपली नाव नोंदणी करू शकता.


नाव नोंदणी करण्यासाठी अधिकृत लिंक.👇


http://training.scertmaha.ac.in/


वरिष्ठ व निवड श्रेणी फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट. ज्यांच्या सेवेला 12 वर्षे पूर्ण झालीत अशां साठी वरिष्ठ व 24 वर्षे पूर्ण झालेल्यांसाठी निवड श्रेणी प्रशिक्षण लागु आहे.


 वरिष्ठ व्यक्तीने श्रेणी/निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू करणे बाबत शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे परिपत्रक.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र म्हणजेच विद्या परिषदेने दिनांक 11 मे 2019 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत पुढील प्रमाणे कळविले आहे.


माननीय आमदार सुधाकर अडबाले यांनी दिलेल्या निवेदनास प्रतिसाद देत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणा संदर्भात नव्याने नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळाली आहे असे कळविले आहे.

परंतु त्यातील दुसरा मुद्दा निशुल्क किंवा विनाश शुल्क प्रशिक्षण आयोजित करणे हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारीतील बाब नसल्याचे देखील कळवले आहे. तसेच सर्व क्षत्रिय अधिकारी यांना प्रशिक्षणाबाबतच्या सविस्तर लेखी सूचना निर्गमित करण्याची कार्यवाही देखील सुरू असून अंदाजे पुढील आठवड्यात ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रिया सुरू होईल असे डॉक्टर नेहा बेलसरे उपसंचालक आयटी व प्रसार माध्यम विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सदर परिपत्रकानुसार माहिती दिली आहे.


ह्या परिपत्रकानुसार पुढील आठवड्यात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षणा करिता ऑनलाइन नाव नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे.




वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.