शालेय विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्याचे काम असमाधानकारक असल्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाने मागितला आयुक्त समक्ष लेखी खुलासा!

शालेय विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्याचे काम असमाधानकारक असल्यामुळे आयुक्त कार्यालयाने मागितला लेखी खुलासा! 

शिक्षण आयुक्तालय या कार्यालयातून निर्गमित दिनांक 22 मे 2023 रोजी च्या परिपत्रकानुसार शालेय विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्याचे काम असमाधानकारक असल्याबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.


राज्यातील सर्व प्रकाराच्या शाळांतील विद्यार्थ्यांची नोंद एनआयसी, पुणे यांच्याकडील सरल प्रणालील स्टुडंट पोर्टलवर करण्यात येते. यासाठी स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांची विविध प्रकारची माहिती नोंद कशाप्रकारे करावी याबाबत शासन निर्णय / शासन परिपत्रक व राज्यस्तरावरून पत्र / परिपत्रक यांच्या माध्यमातून सविस्तर सूचना वेळावेळी देण्यात आलेल्या आहेत. संदर्भीय क्रमांक 1 वरील शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक 3 मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची अचुक नोंद स्टुडंट पोर्टलमध्ये करणे अनिवार्य करण्यात आल्याचे नमूद केले आहे. शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये आधार प्रमाणे संबंधित विद्यार्थ्याचे नाव असावे अशीही तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच क्रमांक 4 मध्ये सतत गैरहजर राहणारे विद्यार्थी यांच्याबाबत करावयाची कार्यपध्दती नमूद केली आहे. शाळांना वारंवार सूचना देवूनही विद्यार्थ्याचे आधार क्रमांक प्राप्त होत नाहीत याचाच अर्थ शाळेकडे आधार क्रमांक नसणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये सतत गैरहजर असणारे विद्यार्थी देखील पदावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर तरतूदीनुसार क्षेत्रिय अधिकान्यानी खात्री करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.

संदर्भ क्रमांक 2 व 3 वरील वित्त विभाग व शालेय शिक्षण विभागाचा विद्यार्थी विषयक लाभ देण्याबाबत डिसेंबर, 2022 अखेर शालेय विद्यार्थ्याचे आधार प्रमाणित करण्याबाबत आदेश होते. याबाबत शासनाकडून वेळोवेळी मुदत दिलेली 
असताना देखील आधार विषयक कार्यवाही पुर्ण होताना दिसून आलेली नाही.

तसेच अध्यापही काही विद्यार्थ्याच्या आधार कार्डची माहिती आधार डिटेल्स यामध्ये नोंद केल्याचे दिसून येत नाही. याबाबत माहे जुलै, 2022 पासून वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी माहे नोव्हेंबर 2022 मध्ये तपासणीबाबत विशेष
अभियान राबविण्यात आलेले होते ज्या शाळांनी अध्यापही ज्या विद्यार्थ्यांची आधार विषयक नोंद केलेली नाही त्यांची पुढील 15 दिवसात दि.10/03/2023 पर्यंत आवश्यक नोद करावी तसेच ज्या शाळा आधार विषयक नोंद करणार नाही त्याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी / केंद्र प्रमुख यांच्या मार्फत त्यांच्या अधिनस्त शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या आधार विषयक नोंद का होत नाही याची खात्री करावी व तद्रतर सदर विधायांबाबत पुढील आवश्यक जसे की शाळेतून नाव कमी करणे (Out of school, Drop box मध्ये नोंद इत्यादी प्रकारची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. संदर्भीय क्रमांक 4 मध्ये नमूद केल्यानुसार सन 2022-23 च्या संच मान्यता आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात येणार आहेत. शाळांनी स्टुडंट पोर्टलमध्ये त्यांच्याकडील इनव्हॅलीड मिसमैच विद्याथी यांच्या माहितीमध्ये आवश्यक दुरुस्ती कोणत्याही परिस्थितीत दिनांक 28/02/2023 अखेर पुर्ण करावी व संच मान्यतेसाठी आपल्या शाळेतील संपूर्ण विद्यार्थी येतील यादृष्टीने दक्षता घेण्याची सूचना आयुक्तालयाचे संदर्भीय क्रमांक 5 अन्वये देण्यात आलेल्या होत्या. उक्त उल्लेखीत प्रमाणे आपणास वेळोवेळी सूचना देऊनही आपल्या जिल्हयातील शाळामधील विद्याथ्यांचे आधार वैधकरण्याचे काम सवगतीने चालत असल्याचे दिसून आल्याने आणास संदर्भ क्र. 6 अन्वये समक्ष खुलासा सादर करण्याचे कळविले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने समक्ष खुलासा सादर करतेवेळीही आपणास विद्याव्याचे आधार वैध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तद्वतरही आपल्या जिल्हयातील शाळांमधील विद्याव्यांचे आधार वैध करण्याच्या दैनंदिन अहवालाचे अवलोकन केले असता व दिनांक २२/०५/२०२३ रोजी आयोजित आढावा बैठकीत घेतलेल्या आढाव्यानुसार प्रगती असल्याचे दिसून आले नाही. सब मा. आयुक्त शिक्षण यानी दि. २२/०५/२०२३ रोजी दिलेल्या निर्देशानुसार आपण गत दोन महिन्यांची दैनंदिनी व सदर प्रकरणी कार्यवाही जलद गतीने होण्याच्या दृष्टीने आपण केलेले दैनंदिन नियोजन, कार्यवाही येणा-या अडचणी व त्यावर केलेले उपाय या माहितीसह खुलासा दि. २३/०५/२०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजता मा आयुक्त शिक्षण यांचेशी समक्ष भेटीत सादर करावा.



वरील शिक्षण आयुक्त कार्यालयाची नोटीस पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

शैक्षणिक बातम्या येण्यासाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.