शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड यांनी दिनांक 26 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे आधार वेद करण्याचे काम असमाधानकारक असल्याने वेतन स्थगित करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्याचे काम असमाधानकारक असल्याने वेतन स्थगित करणे बाबत आपणास कळविण्यात येते की, मागील सहा महिन्यापासून दररोज आधार वैध बाबत रिपोर्ट देण्यात येत असून वारंवार आपणास आधारवैध करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. या बाबत आपणास संदर्भ क्रमांक 4 नुसार आधार वैध करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे तसेच संदर्भ५ नुसार प्रत्यक्ष बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत.
परंतु केवळ केवळ १४ शाळांचे आधार १०० % पूर्ण झाले आहे तर १७७ शाळांचे आधार वैध ९५ ते ९९.९९ टक्के झाले आहे तर २४६ शाळांचे काम ९५ पेक्षा आधार वैध कमी आहे. ज्या शाळांचे आधार वैध चे प्रमाण ९५ % पेक्षा कमी आहे अशा शाळांचे माहे मे २०२३ चे वेतन १०० % आधार वैध होई पर्यंत स्थगित ठेवण्यात येईल. वेतन विलंबास आपण स्वतः जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.
अनुदानित माध्यमिक शाळांची आधार वैध यादी
प्रतिलिपी,
(प्रशांत दिग्रसकर) शिक्षणाधिकारी (मा) जिल्हा परिषद नांदेड
१. अधिक्षक, वेतन पथक माध्यमिक जि.प. नांदेड आपणास देऊन कळविण्यात येते की, काही मुख्याध्यापक वारंवार सांगूनही प्रतिसाद देत नसल्याने यादीतील शाळांचे गटशिक्षणाधिकारी यांचे कडून आधार चे काम समाधानकारक असल्या बाबत चे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय वेतन अदा करू नये.
२. गटशिक्षणाधिकारी आपणास देऊन कळविण्यात येते की, ज्या माध्यमिक अनुदानित शाळांचेविद्यार्थी आधार वैध प्रमाण ९५% पेक्षा जास्त आहे अशा शाळांनाच काम आधार वैध चे काम समाधानकारक असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
It is contempt of supreme court
ReplyDelete👍🙏
Delete