सन २०२२-२०२३ च्या संच मान्यता बाबत शिक्षण संचालकांचे निर्देश

शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 9 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार संच मान्यता 2022-23 बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

ज्या शाळांच्या संच मान्यता सन २०२२-२३ च्या अदयापही काही तांत्रिक अडचणीमुळे संच मान्यता प्रिंट ला उपलब्ध झालेल्या नाहीत याबाबत शासन निर्णय दिनांक ०६.०२.२०२३ मधील घोषित केलेल्या शाळांच्या प्रलंबित संच मान्यतेबाबत दिनांक १०.०४.२०२३ रोजी कार्यशाळा व दिनांक १२.०४.२०२३ ते दिनांक २०.०४. २०२३ या कालावधीत विभागनिहाय संच मान्यता ऑनलाईन शिविर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये Student pending at student portal, Working post pending at school level, Add post is pending, change medium, change category, change management, Generate sm for Dir login इतर तांत्रिक अडचणी प्रकरणी सोडविण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

या व्यतिरिक्तही आपल्या विभागातील संच मान्यता अदयापही प्रलंबित राहील्या असतील तर आपण आपल्या स्तरावर दिनांक १२.०५.२०२३ पर्यंत संच मान्यता प्रलंबित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. ज्यांच्या संच मान्यता दिनांक १२.०५.२०२३ नंतरही कोणत्याही कारणांमुळे प्रलंबित राहतील, त्या सर्व जिल्हयांनी किंवा विभागांनी मा आयुक्त शिक्षण कार्यालयामध्ये दिनांक १३.०५.२०२३ पासून समक्ष उपस्थित राहून प्रलंबित संच मान्यता बाबत उपस्थित राहून संपूर्ण जिल्हयातील संच मान्यता जनेरट करण्याबाबतची कार्यवाही करावी. संपूर्ण जिल्हयातील संच मान्यता जनेरट होईपर्यंत कोणालाही कार्यमुक्त केले जाणार नाही. तसेच ज्या संच मान्यता जनरेट होण्यास प्रलंबित राहील्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी/ विभागीय शिक्षण उपसंचालक यांची राहील.

उपरोक्त नमुद सर्व मुद्यांबाबत कार्यवाही नियोजित वेळेत करणे आवश्यक असल्याने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.



 नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.