मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २६/०५/२०२३ रोजी राज्य मंडळ, पुणे येथे बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीसाठी मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, आयुक्त (शिक्षण), आयुक्त क्रिडा, प्रकल्प संचालक, म.रा.प्रा.परिषद, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालक (प्राथमिक), संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, शिक्षण संचालक (योजना) चे संबंधित अधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते...
सदर बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर माननीय शिक्षण मंत्री यांनी आढावा घेतला यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रप्रमुख भरती बाबत परीक्षा परिषदेमार्फत याबाबत कारवाई सुरू असून अध्यक्ष, आयबीपीएस या कंपनी मार्फत याबाबतचे परीक्षा घेण्यात येणार असून सदरची परीक्षा १७ जून रोजी घेण्याचे प्रस्तावित असले बाबत सांगण्यात आले. १७ जून रोजी परीक्षा घेऊन सदर परीक्षेचा निकाल २५ जून च्या दरम्यान जाहीर करण्याबाबत तसेच ३० जून पर्यंत केंद्रप्रमुखांचे निवड पूर्ण करून त्यांना नियुक्ती देणे बाबत कार्यवाही करावी.
अशा सूचना परीक्षा परिषदेला मा. मंत्री यांनी दिल्या.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments