मोफत गणवेश योजनेबाबत राज्य शासनाने पुढील प्रमाणे प्रेस नोट जारी केली आहे.
प्रेस नोट
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.
प्रस्तुत योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इ.१ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीमधील मुले तसेच दारिद्र रेषेखालील पालकांची मुले यांना दोन गणवेशाचा लाभ देण्यात येतो. तसेच, उपरोक्त शाळांमधील दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
प्रस्तुत योजनेंतर्गत केवळ सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षापुरता एका गणवेशाचा लाभ पुर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येणार आहे. तसेच, उर्वरित एका गणवेशाचा लाभ शासनामार्फत या शैक्षणिक वर्षामध्ये देण्यात येणार आहे.
प्रस्तुत योजनेंतर्गत यापुढे राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना एकसमान एकरंगाचा दर्जेदार गणवेशाचा लाभ देण्याच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समितीस शासनामार्फत गणवेशाचे कापड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर कापडापासून महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत नोंदणीकृत असलेल्या जवळच्या महिला बचत गट / संस्था यांच्याकडून तसेच, नजीकच्या ठिकाणी बचत गट नसेल तर स्थानिक शिवणदारांकडून शिलाई शाळा व्यवस्थापन समितीने करुन सदर दोन गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. गणवेशाच्या शिलाईचा खर्च शाळा व्यवस्थापन समितीस शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल.
याचा अर्थ सध्या तरी विद्यार्थ्यांना एकच गणवेश मिळणार!
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments