डीएड यावर्षी तरी सुरूच राहणार! पूर्वीचे डीएड म्हणजेच आताचे डी एल एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सन 2023 24 बाबत शिक्षण संचालकांचे निर्देश

 डीएड यावर्षी तरी सुरूच राहणार! पूर्वीचे डीएड म्हणजेच आताचे डी एल एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सन 2023 24 बाबत शिक्षण संचालकांचे निर्देश! 


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी दिनांक 24 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार डी एल एड प्रथम वर्ष ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सन 2023-24 साठी अध्यापक विद्यालयांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


शासनपत्र दि.२६/०४/२०१६ नुसार शैक्षणिक वर्ष सन २०१६-१७ पासून राज्यातील डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्यात येते. तसेच शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ पासून डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होणेपूर्वी अध्यापक विद्यालयांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. शैक्षणिक वर्ष सन २०१३-२४ करिता अध्यापक विद्यालयाच्या ऑनलाईन नोंदणी करणेसंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे आहेत.


१. अध्यापक विद्यालयांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणेबाबतची Link दि.३०/०५/२०२३ से ०५/०६/२०२३ याच कालावधीत सुरू राहील.


२. प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांनी https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर Click करावे. 

३. प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांनी Login पर Click करून आपल्या आध्यापक विद्यालयाचे Uhe Password. वापरून Login करावे.

४. Login केल्यानंतर संबंधित अध्यापक विद्यालयाची माहिती Display होईल. यामधील बदल न करावयाची (NonEditable) माहिती संबंधित अध्यापक विद्यालयाच्या NCTE मान्यता पत्राप्रमाणे असलेबाबतची खात्री करावी. यामध्ये तफावत असल्यास संबंधित पुराव्यासह support@deedadmission.in या ई-मेल पर कळविण्यात यावे.

 ५. संबंधित अध्यापक विद्यालयाची बदल करावयाची (Editable) माहिती अद्ययावत करून Save करावी.


६. विहित कालावधीत अध्यापक विद्यालयाची नोंदणी न केल्यास या अध्यापक विद्यालयास शैक्षणिक वर्ष सन २०२३- २४ च्या डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.


करिता शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मधील डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील


उपरोक्तप्रमाणे अध्यापक विद्यालय ऑनलाईन नोंदणीबाबत सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील अध्यापक विद्यालयांना देण्यात याव्यात.


(शरद गोसावी) संचालक


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे,


वरील परिपत्रक लक्षात घेता यानंतर डीएड बंद होईल असे म्हटले जात होते परंतु यावर्षी तरी डीएड प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजेच अजून डीएड किंवा डी एल एड बंद झाले नाही.



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.