सन 2023 24 मधील बदली प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. असे दिनांक चार मे 2023 च्या ग्रामविकास विभागाच्या शासन आदेशावरून आपल्या लक्षात येते.
ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरू झाल्यापासून अगोदर आंतरजिल्हा बदली होते व त्यानंतर जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या जातात. शासनाने बदलीसाठी अभ्यास गट गठीत केलेला असून अभ्यास गटांनी शासनाकडे बदलीसाठी सुधारित सूचना देखील पाठवल्या आहेत. व त्यानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलांबाबत शासन आदेश निर्गमित करून ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यां ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रीया ऑनलाईन पोर्टल द्वारे पारदर्शी पध्दतीने राबविण्यात आलेली आहे. सदर प्रक्रीया राबविताना विविध शिक्षक संघटनाकडून प्राप्त झालेली निवेदने व न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता, सन २०२३ साठी आंतरजिल्हा / जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेबाबतच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा सुचविण्याकरिता दि. १४.०३.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट गठीत करण्यात आलेला आहे. सदर अभ्यासगटाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनानुसार दि.०७.०४.२०२१ रोजीच्या आंतरजिल्हा बदली बाबतच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरु आहे.
३. याकरिता सन २०२३ साठी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने खालील मुद्यांनुसार कार्यवाही करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांना कळविण्यात यावे.
१. निव्वळ रिक्तपदांची यादी ( Clear Vacancy)
२. शिक्षकांचे रोस्टर (बिंदुनामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे
. ३. सन २०२१ च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणारे जे शिक्षक पदोत्रत झालेले आहेत अशा शिक्षकांनी स्वखुशीने पदावनत करण्याबाबत दिलेल्या संमती पत्राबाबत निर्णय घेणे
४. सन २०२३ च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनुसुचित जमातीचे शिक्षक स्थानिक अनुसूचित जमातीचे आहेत किंवा कसे याबाबत पडताळणी करुन त्यांना संगतीपत्र देणे.
५. सन २०२३ च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरुन काही न्यायालयीन / लोकायुक्त / अन्य न्यायाधिकरण यांचे स्वयंस्पष्ट आदेश असल्यास अशा आदेशांची प्रत, मुळ याचिकेचे प्रत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना देणे.
३. उपरोक्त परिच्छेद क्र. २ प्रमाणे कार्यवाही दिनांक १५.०५.२०२३ पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता आपण घ्यावी.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments