नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार डीएड व बीएड अभ्यासक्रम बंद होणार?

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता शिक्षकांसाठी चार वर्षाचा अभ्यासक्रम आणला जाणार आहे.

ए आय सी टी ई च्या सूचनानुसार शैक्षणिक वर्षापासून पारंपारिक बीड अभ्यासक्रम बंद होण्याच्या मार्गावर आहे.


 पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या वर्गात शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी आता इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्रॅम (आयटीईपी) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. ए आणि त्यावरील नॅक दर्जा असलेल्या उच्च शिक्षण संस्थांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्षात समावेश करावा, अशा सूचना एआयसीटीईने जारी केल्या आहेत. यामुळे आता येत्या शैक्षणिक वर्षापासून पारंपरिक बीएड अभ्यासक्रम बंद होण्याच्या मार्गावर आहे.


आयटीईपी हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असणार आहे. विद्यार्थ्यांना बीए, बीएस्सी किंवा बीकॉम या शैक्षणिक अर्हतेसोबतच बीएड ही व्यावसायिक अर्हता मिळविता येईल. यापूर्वी तीन वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षक बनण्यासाठी लागणारी व्यावसायिक अर्हता मिळविण्यासाठी दोन वर्षांचा बीएड कोर्स असा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या आयटीईपी हा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना संबंधित उच्च शिक्षण संस्थांना देण्यात आल्या आहेत.


असा असणार अभ्यासक्रम..


● राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमांची रचना


• पूर्व प्राथमिक ते दुसरी त्यानंतर तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी आणि दहावी तसेच अकरावी आणि बारावी या चार स्तरासाठी सर्वोत्कृष्ट शिक्षक घडविले जाणार


• आयटीईपी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उच्च क्षमता मिळविलेला शिक्षक होणार.


अर्थात वरील बातमी जरी असली तरी सदर अभ्यास करा पुढील वर्षी जरी सुरू झाला तरी अजून दोन वर्षे तरी डीएड व बीएड अभ्यासक्रम बंद होऊ शकणार नाही.

कारण सुरू होणारा अभ्यासक्रम हा चार वर्षाचा असून जरी अभ्यासक्रमासाठी पुढील सत्रापासून प्रवेश झाला तरी सदर अभ्यासक्रम पूर्ण करण्यास विद्यार्थ्यांना चार वर्षे पूर्ण लागतील.

व सध्या ज्या विद्यार्थ्यांनी तीन वर्ष अथवा चार वर्षाच्या डिग्री कोर्स साठी प्रवेश घेतला आहे त्यांना त्यांचा डिग्री कोर्स पूर्ण झाल्यानंतर शिक्षक होण्यासाठी संधी नाकारता येणार नाही म्हणजेच यावर्षी प्रथम वर्षाला डिग्री कोर्सला ज्याने ऍडमिशन घेतली आहे तो त्याचा डिग्री झाल्यानंतर बीएडला ऍडमिशन घेऊ शकेल तोपर्यंत तरी बीएड अभ्यासक्रम चालू ठेवावा लागणार आहे.


 

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.