अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौध्द नागरिकाच्या पाल्यांच्या धर्म व जातीबाबतच्या नोंदणीबाबत - ग्रामविकास विभागाचा शासन आदेश

अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौध्द नागरिकाच्या पाल्यांच्या धर्म व जातीबाबतच्या नोंदणीबाबत ग्रामविकास विभागाने दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी शासन आदेशाद्वारे पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

बालवाड़ी/पहिल्या वर्गात मुलाचे प्रवेश किया नांव नोंदणी करताना विशेषत: अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौध्द पालकांनी सांगितलेल्या धर्माचे नाव धर्माच्या रकान्यात व अनुसूचित जातीचे नाव जातीच्या रकान्यात नोंद करण्याबाबत सर्व सरकारी, अनुदानित, विना अनुदानित शाळाच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 


यानुषंगाने सर्व ग्रामपंचायतींना स्थानिक पातळीवरील शासकीय/अनुदानित/विना अनुदानित शाळा तसेच बालवाड्या येथे प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीमधून धर्मांतरीत बौध्द नागरिकाच्या पाल्यांच्या धर्म/जातीबाबत नोदीबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक २२.०१.२०२१ च्या अर्धशासकीय पत्रातील सूचना संबधित शाळा/बालवाच्या यांच्या निदर्शनास आणण्याबाबत सूचित करावे.


तसेच आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालय येथे देखील वरीलप्रमाणे धर्म/जातीच्या नोंदीबाबत सूचना सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या निदर्शनास आणाव्यात.

वरील प्रमाणे निर्देश सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना ग्रामविकास विभागाने दिले आहेत.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.