आता शिक्षकांची आधार व्हॅलिड करून घ्यावे लागणार! सन 2022-23 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणाली अपडेट.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडांगण अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाने दिनांक 20 एप्रिल 2020 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रका नुसार सण 2022 23 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिटेशन करून घेण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
भारत सरकार शिक्षा मंत्रालय यांचेकडे राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती यु-डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
यु-डायस प्लस मध्ये राज्यातील सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करण्याकरता शाळास्तरावर टॅब ओपन झालेली आहे. आपल्या मार्फत तालुक्यातील सर्व शाळांना आधार व्हॅलिडेशन करण्याकरिता शाळांमधील मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे. व्हॅलिडेशन करताना काही अडचणी येत असल्यास आधार कार्ड वर नोंदविलेले नावाप्रमाणे यु-डायस प्लसमध्ये नाव नोंदविण्यात यावे. सदरचे व्हॅलिडेशन दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रणाली सुरू ठेवण्यात आलेली आहे.
शाळांची माहिती वेळेत पूर्ण करून न घेतल्यास याबाबतची जबाबदारी सर्वस्वी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
सोबत यु-डायस प्लस प्रणाली मधील शिक्षकांची संख्या दिलेल्या आहे.
सदर पत्र सरोज जगताप,
सहा. संचालक (कार्यक्रम) म.प्रा.शि.प., मुंबई. यांचे स्वाक्षरीनिशी निर्गमित करण्यात आलेले आहे.
१) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
२) मा. आयुक्त, महानगरपालिका सर्व.
३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.
यांना देखील सदर आदेशाची प्रत निर्गमित करण्यात आली आहे.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments