सन 2023 मधील सर्व शाळांसाठी उन्हाळी सुट्ट्यांबाबत व शैक्षणिक सत्र 2023-24 बाबत शासन निर्णय व संचालकांचे पत्र.
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2023 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2023 सुरू करणे बाबत जनसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.
सदर पत्र हे शासन परिपत्रक दिनांक 11 एप्रिल 2022 च्या संदर्भानुसार निर्गमित केले आहे ज्यामध्ये प्राथमिक शाळांचा देखील उल्लेख आहे.
सदर संदर्भीय शासन परिपत्रकानुसार दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने शिक्षण संचालक माध्यमिक यांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
1) मंगळवार दिनांक 2 मे 2019 पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी विदर्भ वगळून 11 जून 2023 पर्यंत ग्राह्य धरावा पुढील शैक्षणिक वर्ष सन 2023 24 मध्ये दुसरा सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी सुरू होतील.
2) इयत्ता पहिली ते नववी इयत्ता अकरावीचा निकाल दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल तथापि तो निकाल विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.
3) शाळांमधून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणाचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक ते निर्देश आपले स्तरावरून देणेबाबत उपसंचालक/शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.
माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
वरील प्रमाणे शाळेच्या सुट्टी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत देखील शिक्षण उपसंचालक सर्व विभाग व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व जिल्हा परिषद देखील सुचित करण्यात आले आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments