शालार्थ अपडेट!
शालार्थ प्रणालीमध्ये नियमित वेतन व्यतिरिक्त अन्य देयकाचे Tab Inactive करणेबाबत दिनांक 29 मार्च 2023 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
सदर पत्रानुसार आता शालार्थ प्रणालीमध्ये नियमित वेतन व्यतिरिक्त अन्य देयके सादर करता येणार नाही!
उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, शालार्थ वेतन प्रणालीमध्ये काही जिल्हयामध्ये नियमित वेतनाशिवाय इतर देयकांच्या रकमा जसे की Basic arrears, DA arrears या Active Tab मधून नियमित वेतनापेक्षा अधिकच्या रकमा DDO-1, DDO 2 च्या स्तरावरून आहरित झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आर्थिक शिस्तीचे पालन होताना दिसून येत नाही. आर्थिक शिस्त बिघडू नये म्हणून सन २०२३ २४ मध्ये माहे एप्रिल २०२३ पासून शालार्थ प्रणालीमध्ये पुढील प्रमाणे बदल करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.
यास्तव आपणास कळविण्यात येते की, माहे मार्च २०२३ पेड ईन एप्रिल २०२३ च्या वेतनापासून नियमित वेतनाशिवाय अन्य बाबीसाठीची रक्कम देयकामध्ये समाविष्ट करता येणार नाही. फक्त नियमित वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, नक्षलग्रस्त भत्ता, आदिवासी भत्ता, शहरपुरक भत्ता, एनपीएस १४ टक्के इत्यादी भत्ते व नियमित वेतनच आहरित होईल अशी व्यवस्था शालार्थ मध्ये करावी. तसेच वरील नियमित वेतनाच्या बाबी वगळता इतर बाबीचे रकाने (टॅब) शालार्थमध्ये पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात यावे. (तात्पुरत्या स्वरूपात टॅब
Inactive करण्यात यावे.) तसेच माहे मार्च २०२३ च्या वेतनामध्ये जर सदर टॅब मध्ये रक्कमा दर्शवून देयके सादर केली असतील तर अशी देयके Reject करण्यात यावीत. जेणेकरून शालार्थ प्रणालीमध्ये आर्थिक अनियमिततेला वाव राहणार नाही.
म्हणजेच वरील सूचनानुसार नियमित वेतनाव्यतिरिक्त इतर कोणतीही देयके मार्च पेड इन एप्रिल महिन्यात व जोपर्यंत संचालकांचे आदेश होत नाही तोपर्यंत सादर करता येणार नाही.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments