संच मान्यता 2022-23 अपडेट - आधार अपडेट करण्याकरिता दिनांक ३०.०४. २०२३ पर्यंत मुदत..

 सन २०२२-२३ च्या संच मान्यता उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे


बैठक दिनांक १०.०४.२०२३, स्थळ आझम कॅम्पस, कॅम्प, पुणे वेळ: सकाळी १०.३०


संच मान्यता प्रकरणी संदर्भीय शासन निर्णय दिनांक ०६.०२.२०२३ नुसार सन २०२२-२३ च्या संच मान्यता आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार करण्यात येणार आहेत. त्यामुळे आपल्या विभागाच्या अधिनस्त जिल्हयातील ज्या शाळा / तुकडया शासन निर्णय दिनांक ०६.०२.२०२३ अन्वये अनुदानावर घोषित करण्यात आलेल्या आहेत त्या शाळांच्या संच मान्यता सन २०२१-२२ व २०२२-२३ च्या अदयापही काही तांत्रिक अडचणीमुळे संच मान्यता प्रिंट ला उपलब्ध झालेल्या नाहीत त्या शाळांच्या काय अडचणी आहेत?, याबाबत संचालनालयाच्या स्तरावर वेळोवेळी शिबीर आयोजित करून संच मान्यता अदयापही प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. सन २०२२-२३ च्या संदर्भात आधार अपडेट करण्याकरिता दिनांक ३०.०४. २०२३ पर्यंत मुदत देण्यात


आलेली आहे. तसेच एनआयसी पुणे यांच्याकडून विभाग व जिल्हा निहाय व वर्षनिहाय प्रलंबित असलेल्या संच मान्यता बाबत त्यांची .कारणे प्राप्त झालेली आहे. नव्याने अनुदानावर आलेल्या / टप्पा वाढ झालेल्या शाळांना अनुदान सुरू करणे, शिक्षक पदभरतीसाठी रिक्त पदांची निश्चिती करणे, तसेच अतिरिक्त शिक्षक यांचे समायोजन करण्यासाठी सन २०२२-२३ च्या संच मान्यता उपलब्ध असणे आवश्यक आहे.


या अनुषंगाने सन २०२२-२३ पर्यंतच्या सर्व शाळांच्या संच मान्यता उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आपण च आपल्या अधिनस्त संच मान्यतेचे जाणकार अधिकारी व संबंधित लिपीक व प्रोग्रामर यांनी दिनांक १० एप्रिल, २०२३ रोजी आझम कॅम्पस, कॅम्प, पुणे येथे सकाळी १०.३० वाजता एकदिवसीय शिबीरास उपस्थित राहून आपणास आपल्या विभागातील व अधिनस्त जिल्हा निहाय व वर्षनिहाय प्रलंबित असलेल्या संच मान्यता बाबत त्यांची कारणे आपणांस देण्यात येणार आहे, तसेच याबाबत करावयाची कार्यवाही ही आपणांस सांगण्यात येणार आहे, त्यांनंतर विभागनिहाय व जिल्हानिहाय प्रत्यक्ष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे, त्याचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या लवकरच कळविण्यात येईल.

तरी उपरोक्त नमुद संच मान्यता शिबिराकरीता वर नमुद सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी न चुकता उपस्थित रहावे, जर यानंतरही संच मान्यता प्रलंबित असल्यास आपणांस सर्वस्वी जबाबदार ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी.


कृष्णकुमार पाटील

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.