दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार नेहमी पासून विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर निपुण महाराष्ट्र निपुण भारत अभियानांतर्गत शाळा पूर्वतयारी पहिले पाऊल चामलबजावणी मध्ये येणारे शाळास्तर मेळावे घ्यावे किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता व घ्यावे तर कोणत्या वेळात घ्यावे हे देखील स्पष्ट नव्हते.
मात्र आज दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक यांनी परिपत्रक निर्गमित करून सदस्य मिळावे केव्हा आणि कसे घ्यावेत याबाबत सुधारित निर्देश निर्गमित केले आहे ते पुढील प्रमाणे.
जागतिक बैंक पुरस्कृत "STARS" उपक्रमातंर्गत राज्यात सन २०२२-२३ पासून “पहिले पाऊल" या राज्यस्तरीय मेळावाचे आयोजन करण्यात आलेले होते, त्याची परिणामकारकता बघता राज्यातील जिल्हा परिषदातील शाळांमध्ये दाखलपात्र मुलांची शाळा पूर्वतयारी अधिक चांगली झाल्याचे दिसून आले आहे,
संदर्भीय शासन परिपत्रक क्र.२ अन्वये राज्यातील उष्णतेची लाट लक्षात घेऊन राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दि.२५.०४.२०२३ पासून सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यामध्ये काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे.
सन २०२३-२४ मध्ये देखील सदर मेळाव्यांचे आयोजन सर्व जिल्ह्यामध्ये करण्याच्या अनुषंगाने संदर्भीय पत्र क्र.१ अन्वये जिल्हा स्तरावर सुचना देण्यात आलेल्या आहेत.
मेळाव्यादरम्यान उष्माघात प्रकार घडू नये किंवा मेळाव्यात भाग घेणाऱ्या विद्यार्थी, माता पालक व शिक्षकांचा यांची कोणती हानी होऊ नये या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळापूर्व तयारी मेळावे - "पहिले पाऊल" हे सकाळी ८ ते ९ या वेळेत आवश्यकती काळजी घेऊन आयोजीत करावेत, या सुचना संबधीता ना देण्यात याव्यात ही अशी विनंती राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी आयुक्त शिक्षण, आयुक्त एकात्मिक बालविकास प्रकल्प, आयुक्त महानगरपालिका सर्व, संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, यांचे सोबतच जिल्हाधिकारी सर्व, विभागीय आयुक्त सर्व, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व व इतर सर्व पर्यवेक्षीय यंत्रणा यांना सुधारित निर्देश देण्यात आले आहेत.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments