महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करणे व राज्यातील शाळांचा निकाल घोषित करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२३ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष सन २०२३ - २४ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत संदर्भिय क्र. १ वरील शासन निर्णयानुसार तपशिलवार सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या संदर्भिय क्र. २ वरील पत्रान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. उक्त सूचनांमध्ये सुट्टीचा कालावधी, शाळांचे निकाल जाहीर करणे, सन २०२३-२४ चे आगामी शैक्षणिक वर्ष सुरू करणे इत्यादीबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन असून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता दिनांक ६ मे २०२३ रोजी आहे. महाराष्ट्र दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे.
१. दिनांक १ मे, २०२३ रोजी 'महाराष्ट्र दिन' सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात यावा.
२. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक ६ मे २०२३ रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा आणि विद्यार्थी/ पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे. तसेच, निकालासोबत उपक्रम/कार्यक्रमांचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात यावा.
३. संदर्भिय क्र. १ वरील शासन निर्णय आणि संचालनालयाच्या संदर्भिय क्र. २ वरील पत्रामध्ये दिलेल्या सूचनांनुसार शाळांच्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२३ २४ सुरू करण्याच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व तसेच शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग महानगरपालिका सर्व यांना वरील प्रमाणे निर्देश दिले आहेत
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
2 Comments
Shaikh faiz
ReplyDeleteYes
Delete