NPS/DCPS धारक कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत राज्य लेखा विभागाचे परिपत्रक

 संचालनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्याच्या राजकीय निवृत्तीवेतन योजना विभागाने दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी परिभाषित अंशदान निवृत्ती योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


उपरोक्त संदर्भाकित विषयानुरूप, परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचान्याला रुग्णता निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदी दिनांक ०२१/१२/२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मच्या-यांना लागू आहेत.


उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णयातील नमूद तरतुदींमधील मुद्दा क्र. ०३ नुसार दिनांक ०२/११/२००५ ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना- ३ मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करणे क्रमप्राप्त ठरते. त्यानुसार कुटुंबनिवृत्तीवेतन धारकाला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज/लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ अनुज्ञेय होईल. असे नमूद करण्यात आले आहे.

या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत आपणाकडे सादर करण्यात आलेले मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांचे तसेच, रुग्णता सेवानिवृत्त कर्मचान्यांचे Exit Withdrawal चे प्रस्ताव प्राप्त झाले असल्यास त्यांचे संदर्भिय शासन निर्णयानुसार विहीत नमुन्यातील विकल्प प्राप्त करुन घेण्याबाबत संबंधित कार्यालय प्रमुखांना कळविण्यात यावे व त्यांचे विकल्प प्राप्त करुन घेण्याबाबतचा पाठपुरावा आपल्या स्तरावरुन करण्यात यावा. उपरोक्त नमूदप्रमाणे संबंधितांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत संबंधित शासन निर्णयामधील नमूद तरतुदीनुसार विहीत विकल्प नमूना दिल्यास नियमानुसार Exit Withdrawal ची कार्यवाही करावी. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ अंतर्गत कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय होण्याबाबतचा विकल्प दिल्यास आपणाकडे प्राप्त झालेला Exit Withdrawal चा प्रस्ताव आक्षेपित करुन संबंधित कार्यालयास परत करण्याची कार्यवाही करावी.

संचालक, संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांनी वरील प्रमाणे निर्देश अधिदान व लेखा अधिकारी अधिदान व लेखा कार्यालय वांद्रे पूर्व मुंबई व कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय सर्व यांना दिले आहेत. 


सर्व कार्यालयातून मंजूर झालेले सर्व प्रकरणे अंतिम निधी प्राप्तीसाठी व मंजुरातीसाठी कोषागार मध्ये जातात व त्यानंतरच निधी प्राप्त होऊन सदर व्यक्तीला तो मिळतो. कोषागार कार्यालयाला जर योग्य त्या सूचना वरिष्ठ स्तरावरून नसतील तर त्यावर कार्यवाही होत नाही त्यामुळे कोषागार कार्यालयासाठी आजचे परिपत्रक जे निर्गमित झाले आहे ते महत्त्वाचे आहे जिल्ह्यातील इतर कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रकरणे अंतिम मान्यतेसाठी कोषागार कार्यालयात जातील व तेथे ती प्रकरणे मंजूर होण्यासाठी सदर परिपत्रक महत्त्वाचे आहे. 



वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.