बदली अपडेट - अवघड क्षेत्रातील बदल्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश

 अवघड क्षेत्रातील बदल्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश.


याचिका क्रमांक 1560/2023 श्री. लिलयर शामराव पिंपळशेंडे व इतर


विरूध्द


1. महाराष्ट्र शासन

 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर


याचिका क्रमांक 1560/2023 या प्रकरणात मा. न्यायाधिश, उच्च न्यायालय, खंडपीठ, नागपूर यां दिनांक 15.03.2023 रोजी आदेश पारित केले आहे की To Facilitate consideration of the aforess representation the representation of the petitioners shall remain present before the Chi Executive officer, zilla parishad, chandrapur on 17.03.2023 at 11.00 am. The necessa details of the said grievance shall be furnished by the said representative. The chief Executi Officer shall consider the said grievance and indicate his decision thereon.


सदर आदेशाच्या अनुषंगाने याचिकाकर्ते यांनी दिनांक 17.03.2023 रोजी दुपारी 2.00 ते 25 दरम्यान हजर राहुन त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. त्यामध्ये प्रामुख्यांनी उपस्थित केलेल्या मुदयारनिह खालील प्रमाणे उलगडा करण्यात येत आहे.


तसेच शिक्षकाच्या प्रत्येकाच्या लॉगीनवर नियोजित कृतीचे वेळापत्रक, सर्व कर्मचाऱ्याची यादी, अवघड क्षेत्राची यादी बदली झालेले आदेश, बदलीबाबत माहीतीचे मार्गदर्शक चलचित्र इत्यादी

बाबी उपलब्ध करून दिलेले आहे.


1. शासन निर्णय 7 एप्रिल 2021 जिल्हांतर्गत बदल्याचे सुधारित धोरण निश्चत केले त्यानुसार अवा क्षेत्रांचे 7 निकष दिले त्यापैकी 3 निकष पुर्ण करणा-या गांव / शाळा यांना अवघड म्हणून घो करण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्हात एकुण 237 गांव / शाळा अवघड म्हणून घोषित  करण्यात, आली. सदर यादी घोषित करतांना सर्व शिक्षकांना शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व मुख्यकार्याकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे कडे काही आक्षेप असल्यास अपील करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यानुसार प्राप्त आपील घेवूनच सदर गांवे / अवघड म्हणून घोषित केलीत. याच अवघड गावांत पैकी 128 अवघड क्षेत्रातील रिक्त पदे असल्याने ती पदे बदलीने भरण्याकरीता सोप्या क्षेत्रात 10 वर्षे सेवा झालो आहे अशा शिक्षकांची यादी संगणक प्रणालीव्दारे प्रसिध्द / जाहिर करण्यात आलेली आहे. सदरची यादी ही प्रत्येक शिक्षकांना त्यांच्या लॉगिन मध्ये बघन्या करीता उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक शिक्षकांस सदर यादी माहीत व्हावी म्हणून ई-मेल तसेच सोशल माध्यमाव्दारे प्रसिध्द करण्यात आलेली आहे.


2. शासन निर्णय 7 एप्रिल 2021 जिल्हांतर्गत बदल्याचे सुधारित धोरण निश्चत केले त्यानुसार सर्व बदली प्रकीया पारदर्शक व सुलभरित्या करण्याकरीता ऑनलाईन संगणक प्रणाली मार्फत करण्याचे ठरविले त्याकरीता ग्राम विकास विभाग महराष्ट्र शासनव्दारे विन्सेस कंपनीची निवड केली त्यांनी प्रत्येक शिक्षक तसेच गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्यकार्यकारी यांना लॉगीन सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्हा स्तरावरून शालार्थ प्रणालितील शिक्षकांचा शालार्थ आयडी, नांय, त्यांचा मोबाईल क्रमांक इत्यादी प्राथमिक माहिती घेवून लॉ गगीन व्दारे स्वताची माहिती भरली व स्वतःची माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच स्वतः चे प्रोफाईल स्विकार केला आहे.


सदर संगणक ऑनलाईन माहिती भरल्यानंतर प्रत्येकास प्रत्येकाची माहिती बघण्यास प्रत्येकाच्या लॉगीनवर माहिती उपलब्ध आहे. ज्यांना आपली संगणकाची माहिती चुकली आहे किंवा इतराने चुकीची माहिती भरली असल्यास शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील 2.4.3 मध्ये नुसार प्रत्येक शिक्षकास ऑनलाईन पध्दतीने अपील करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु याचिकाकर्ता यांनी त्यावेळी शिक्षणाधिकारी किंवा मुख्यकार्यकारी यांचेकडे अपील केलेली नाही.


शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 अपील करण्याची संधी उपलब्ध होती. इतर शिक्षकांनी चुकीची माहिती भरली आहे हे माहिती असतांना त्यावेळी अपील न करता आता अवघड शाळेत बदली होणार म्हणून बदलीचे 1 ते 6 टप्पे संपल्यानंतर बदलीच्या शेवटच्या टप्यात मुद्दा उपस्थित केला. तसेच शासन निर्णयातील 5.10 मध्ये गैरसोयीची नियुक्ती म्हणजे बदल्यामध्ये अनियमितता नव्हे असे नमुद आहे. चंद्रपूर जिल्हात आज रोजी जिल्हा परिषद शाळेत अंदाजे 1 लाख 08 हजार विदयार्थी आहे त्यापैकी अवघड क्षेत्रातील 342 गावांत अंदाजे 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे जिल्हातील प्रत्येक विदयाचांस शिक्षण देण्याचे दायित्व शिक्षक व प्रशासन यांचेवर असल्याने सदर प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.


आदेश:- 1. दिनांक 17.03.2023 रोजी प्राप्त झालेले याचिककर्ते यांचे निवेदन अमान्य करण्यात येत आहे.


2. सदर आदेशाने आपले समाधान न झाल्यास शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील 5.10.2 नुसार मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांचे कडे 7 दिवसाच्या आत दाद मागता येईल.

वरील प्रमाणे निर्देश माननीय विवेक जॉनसन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर  यांनी दिले आहेत.

सदर आदेशानुसार अवघड क्षेत्रातील झालेल्या बदलांमध्ये झालेल्या अनियमित ते बाबत याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुनवाई घेऊन त्यांचे सर्व मुद्दे फेटाळले आहेत.





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.