आज दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत पुढीलप्रमाणे दिले आहेत.
शासन निर्णय दि.०२.१२.२०२२ अन्वये सन २०१७ ते २०२२ मध्ये ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे आंतरजिल्हा बदली झालेल्या व मुळ जिल्हा परिषदेने अद्याप कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करताना अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच दि.२७.०२.२०२३ रोजीच्या शुध्दीपत्रकान्वये अशा शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करणेबाबत व प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर शासन निर्णयातील तरतूदी स्वयंस्पष्ट आहेत. त्यानुसार आपल्या स्तरावरुन पुढील कार्यवाही करावी.
संदर्भातील दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी च्या शुद्धिपत्रकानुसार 2017 पासून तर 2023 पर्यंत ऑनलाईन आंतरजिल्हा बदली झालेल्या परंतु अद्याप कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना दिनांक एक एप्रिल ते पंधरा एप्रिल 2023 या कालावधीत कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करणे अपेक्षित होते.
तर दिनांक 15 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करणे अपेक्षित आहे.
दिनांक 27 फेब्रुवारी 2023 चा कार्यमुक्ती बाबतचा शासन निर्णय
दिनांक 2 डिसेंबर 2022 चा कार्यमुक्ती संदर्भातील शासन निर्णय
0 Comments