वर्ग 9 वी व त्या पुढील वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी - Young Scientist Programme अन्तर्गत ऑनलाइन अर्ज करा व सहभागी व्हा इस्रोच्या दोन आठवड्याच्या कार्यशाळेत!
जर तुमच्या ओळखीतील विद्यार्थी नवव्या वर्गात किंवा त्या पुढील वर्गात शिकत असतील आणि त्यांना वैज्ञानिक क्षेत्रात तसेच अंतराळ क्षेत्रात रस असेल तर तो किंवा ती इस्रो द्वारा आयोजित उन्हाळी वर्गात म्हणजेच युविका समर कॅम्प मध्ये दिनांक 11 मे 2023 पासून सुरू होणाऱ्या सहभागी होण्यासाठी दिनांक 9 एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळा वर जाऊन करू शकतात.
जर त्यांची निवड झाली तर त्यांना इसरोच्या अहमदाबाद/बेंगलुरु/शिलॉंग किंवा त्रिवेंद्रम या केंद्रावर जावे लागेल.
नोंदणी करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ लिंक.. 👇
https://www.isro.gov.in/YUVIKA.html
अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक👇
दिनांक 15 मार्च 2023 रोजी सदर कार्यक्रमाची जाहिरात निघाली आहे.
सदर कार्यक्रमासाठी दिनांक 20 मार्चपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
तीन एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक असणार आहे.
अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची पहिली लिस्ट दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी जाहीर होईल.
जागा शिल्लक राहिल्यास किंवा निवड होऊन देखील पहिल्या लिस्ट मधील काही विद्यार्थी न आल्यास दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी निवड झालेल्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित इस्रोच्या केंद्रावर दिनांक 14 मे 2023 रोजी किंवा इस्रो ने ईमेलद्वारे कळविलेल्या दिनांकानुसार रिपोर्ट करावा लागेल.
युविका अंतर्गत उन्हाळी वर्ग म्हणजेच समर कॅम्प हा दिनांक 15 मे ते 26 मे 2023 या कालावधीत राहील.
दिनांक 27 मे 2023 रोजी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना समर कॅम्प मधून सेंड ऑफ दिला जाईल.
अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक.. 👇
विद्यार्थ्यांची या समर कॅम्प साठी निवड पुढील गोष्टी लक्षात घेऊन करण्यात येईल.
वर्ग आठवी किंवा शिकत असलेल्या वर्गाअगोदरच्या वर्गात विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण यावरून 50% गुणांकन करण्यात येईल.
ऑनलाइन प्रश्नावली मधील प्रतिसादावरून दहा टक्के गुण दिले जातील.
विज्ञान जत्रेतील सहभाग शाळास्तर जिल्हास्तर व राज्यस्तर आणि त्यापेक्षा वरील स्तर मागील तीन वर्ष मधील शाळास्तर 2% गुण/ जिल्हा जिल्हास्तरासाठी 5% गुण/ राज्यस्तर किंवा त्यापेक्षा वरील स्तरासाठी 10% गुण असे गुण देण्यात येतील.
ओलंपियाड परीक्षेमधील किंवा समक्ष परीक्षेमधील शाळा जिल्हा व राज्य त्यापेक्षा वरील स्तरासाठी मागील तीन वर्षासाठी दोन चार किंवा पाच टक्के गुण ग्राह्य धरले जातील.
विद्यार्थी मागील तीन वर्षात स्काऊट गाईड एनसीसी एनएसएस चा सदस्य मागील तीन वर्षात असेल तर त्याची पाच टक्के गुण ग्राह्य धरले जातील.
क्रीडा स्पर्धेत शाळास्तर जिल्हास्तर राज्यस्तर किंवा त्यापेक्षा वरील स्तरावर विद्यार्थी सहभागी झाला असेल तर दोन चार अथवा पाच टक्के गुण ग्राह्य धरले जातील.
जर विद्यार्थी ग्रामीण भागात खेडेगावात शिकत असेल तर त्याला पंधरा टक्के अधिकचे गुण दिले जातील.
अर्ज करण्यासाठी अधिकृत लींक👇
https://www.isro.gov.in/YUVIKA.html
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Join WhatsApp Group
जॉईन टेलिग्राम ग्रुप
Thank you🙏
0 Comments