March Ending Effect - शनिवार व रविवारी देखील शिक्षणाधिकारी कार्यालय सुरू ठेवण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

 शनिवार व रविवारी देखील शिक्षणाधिकारी कार्यालय सुरू ठेवण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश! 


प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य या कार्यालयातून निर्गमित दिनांक 24 मार्च 2023 रोजी च्या आदेशानुसार आर्थिक वर्ष 2022-23 मधील कामे दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याकरिता दिनांक 25 व 26 मार्च 2023 रोजी सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवणे व निर्धारित करून दिलेली कामे पूर्ण करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


आर्थिक वर्ष सन 2022 23 मध्ये मंजूर तरतूद पूरक मागणी द्वारे मंजूर तरतूद व सुधारित अंदाजामध्ये नमूद केलेली तरतूद 100% उपलब्ध होणार आहे. आर्थिक वर्ष संपण्यास खूपच कमी कालावधी राहिला आहे सब 2022-23 या आर्थिक वर्षांमध्ये मंजूर झालेल्या तरतुदी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी शंभर टक्के खर्च करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संदर्भीय पत्रा अन्वये दिलेले आहेत. दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार नियमानुसार प्राप्त ठरणाऱ्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत वेतन अदा करण्याची कार्यवाही करणे देखील आवश्यक आहे. तसेच दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीमधील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आर्थिक कामकाज ठप्प झाले होते.

उपरोक्त बाबी विचारात घेता सर्व प्रकारची देयके पारित करून संबंधितांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करणे दिनांक ६ मार्च 2023 च्या शासन निर्णयाद्वारे पात्र शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 31 मार्च 2023 पण पूर्वी वेतन अदा करण्याकरता आवश्यक ती सर्व कामे करणे व आर्थिक आर्थिक वर्षाअखेरची इतर अनुषंगिक कामे दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत पार पाडणे आवश्यक आहे त्यामुळे दिनांक 25 व 26 मार्च 2023 रोजी कार्यालय सुरू ठेवून निर्धारित करून दिलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत.

वरील प्रमाणे निर्देश महाराष्ट्राचे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व व शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर व दक्षिण मुंबई यांना दिले आहेत.





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.