अकोला जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या नियोजनातच 10 मार्च 2023 ते 30 एप्रिल 2023 पर्यंत सकाळ कालावधीत (सकाळी सात ते अकरा वाजून वीस मिनिट) शनिवार प्रमाणे तासिका पूर्ण करून घेण्यात याव्यात.
असे निर्देश शिक्षणाधिकारी यांनी अकोला जिल्ह्यातील सुट्ट्यांच्या नियोजनातच तशी तरतूद करून ठेवली आहे.
त्यामुळे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना दिनांक 10 मार्च 2023 पासूनच सकाळच्या शाळा सुरू झाल्या आहेत.
सर्वसाधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळा सुरू झाल्यामुळे दिनांक 20 मार्च 2023 पासून सकाळ सत्रात शाळा भरवल्या जातात.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या संघटनांनी10 मार्च 2023 पासून सकाळच्या शाळा शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन ऊन वाढू लागल्यामुळे सकाळ-सत्रात शाळा करण्यात याव्या अशा प्रकारची निवेदने देऊन विनंती केली आहे.
परंतु मध्येच वातावरण बदलल्यामुळे व ढगाळ वातावरण झाल्यामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे व त्यामुळे सदर मागणीवर निर्णय बऱ्याच ठिकाणी झालेला नाही.
लातूर विभागात मात्र एक मार्चपासूनच सकाळ सत्रात शाळा सुरू करण्याबाबत लातूर विभागाच्या विभागीय उपसंचालकांनी शिक्षणाधिकारी यांना पत्र निर्गमित केले आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments