उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात भरवणे बाबत विभागीय शिक्षण उपसंचालकांचे आदेश.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागल्यामुळे व बऱ्याचशा शाळेत पुरेशा पाण्याची उपलब्धता उन्हापासून वाचवण्यासाठी इतर साधनांची उपलब्धता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात प्रचलित नियमानुसार व पद्धतीनुसार जरी 20 मार्च पासून सुरू होत असल्या तरी त्या अगोदरच शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबत विविध संघटना आपापल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदने देत आहेत.
दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी च्या विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर यांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात भरवणे बाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद लातूर नांदेड उस्मानाबाद यांना पत्र लिहून कळविले आहे.
फेब्रुवारी 2023 पासून उन्हाची तीव्रता लक्षात घेता सकाळ शाळा भरवले बाबत विभागीय उपसंचालक कार्यालयास निवेदन प्राप्त झाले होते.
सदर निवेदनामध्ये माही फेब्रुवारी 2023 पासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू नये व विद्यार्थी व शिक्षकांना आरोग्याचे हित लक्षात घेऊन दिनांक 1 मार्च 2023 पासून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याबाबत विनंती केली आहे सुलभ संदर्भाकरिता सदर निमित्तानाची प्रत देखील शिक्षणाधिकारी यांना पाठवण्यात आली आहे.
तरी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मुद्द्यांबाबत शासनाच्या प्रचलित नियमानुसार यथा नियम कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाही बाबत संबंधित निवेदन करते यांना आपल्या स्तरावर कळवण्यात यावे अशा सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद लातूर नांदेड उस्मानाबाद यांना दिल्या आहेत.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments