शिक्षण हक्क अधिनियम 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल लिंक.
सन 2023 24 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 3 मार्च 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करून पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे सण 2023 24 या वर्षाची आरटीई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत असून सन 2023 24 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया अंतर्गत दिनांक 1 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तरी पालकांनी प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता खालील संकेतस्थळाचा वापर करण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.
https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex
वरील लिंक वर जाऊन पालक आपल्या मुलांच्या 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत अर्ज भरू शकतात.
तरी याबाबत व्यापक स्तरावर मोफत प्रसिद्धी देण्यात यावी अशा सूचना शिक्षण संचालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका, शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व, प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका सर्व यांना दिल्या आहेत.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments