प्राथमिक पदवीधर शिक्षक इयत्ता ६ वी ते ८ वी यांना लागू करावयाच्या वेतनश्रेणी बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन आदेश.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांना लिहिलेल्या पत्रानुसार पवित्र प्रणाली मार्फत 2019 मध्ये नियुक्त प्राथमिक पदवीधर शिक्षक इयत्ता सहावी ते आठवी यांना लागू करावयाच्या वेतनश्रेणीबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
पवित्र प्रणाली मार्फत 2019 मध्ये नियुक्त प्राथमिक प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये जसं की जिल्हा परिषद नगरपरिषद महानगरपालिका खाजगी अनुदानित शाळा एस 10 किंवा एस 14 अशा वेगवेगळ्या वेतनश्रेणी लागू केल्या असल्याचे शासनास प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने शासन निर्णय शासन नियम मधील तरतुदी विचारात घेऊन याबाबत आपले स्वयं स्पष्ट अभिप्राय सादर करणेबाबत कळविले होते त्या अनुषंगाने आपण अभिप्राय दिले असून जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद कटक मंडळे या आस्थापनेवरील पवित्र प्रणाली अंतर्गत नियुक्त उमेदवारांना सेवा सातत्य देताना एस 10 29 हजार 200 ते 92 हजार 300 या वेतनश्रेणीत सेवा सातत्य देता येईल तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये नियुक्त प्रवर्गानुसार वेतनश्रेणी देय ठरेल असे अभिप्राय दिले आहेत.
त्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की राज्यातील उच्च प्राथमिक वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावयाच्या अनुषंगाने अभ्यास करून शिफारस करण्याकरिता आयुक्त शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे सदर समितीने शासनास अद्यापी अहवाल सादर केला नाही सद्यस्थितीत इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गावरील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना देय असलेली वेतनश्रेणी शासन परिपत्रक दिनांक 13 ऑक्टोबर 2016 अन्वये निर्गमित केलेल्या सूचना लागू आहेत.
त्यानुसार उच्च प्राथमिक स्तरावर पदवीधर शिक्षकांची विषय संवर्गनिहाय विज्ञान भाषा सामाजिक शास्त्र सेवा जेष्ठता यादीनुसार एक तृतीयांश सेवाजेष्ठ शिक्षकांनाच पदवीधर वेतनश्रेणी लागू आहे उर्वरित शिक्षक जरी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक असले तरी त्यांना सद्यस्थितीत पदवीधर वेतनश्रेणी अनुदय नसून त्यांना नियमित वेतनश्रेणी एस 10 (29200 ते 92300) लागू आहे सबब इयत्ता सहावी ते आठवी उच्च प्राथमिक स्तरावर पवित्र प्रणाली मार्फत नियुक्त शिक्षकांना सद्यस्थितीत शासन परिपत्रक दिनांक 13 ऑक्टोबर 2016 मधील तरतुदी लागू असून सदर शिक्षकांच्या व्यतिरिक्त बाबत त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी तसेच काही आस्थापनांनी वेगवेगळी वेतनश्रेणी लागू केलेली असल्यास सदर तपासून शासन परिपत्रक दिनांक 13 ऑक्टोबर 2016 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार वेतन श्रेणी लागू करणे बाबत योग्य त्या सूचना संबंधितांना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात असे निर्देश दिले आहेत.
वरील परिपत्रकाचा अर्थ असा की जरी पवित्र पोर्टलवरून प्राथमिक पदवीधर प्रशिक्षित शिक्षक म्हणून तुमची नियुक्ती झालेली असेल तरी देखील तुम्हाला 13 ऑक्टोबर 2016 रोजी च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षक यांना लागू असलेली वेतनश्रेणी लागू आहे.
आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सरसकट सर्वांना प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे सदर समितीचा निर्णय अजूनही शासनास प्राप्त नाही किंवा त्यावर शासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
वरील शासन आदेश संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments