केंद्रप्रमुख विभागीय भरती 2023.
केंद्र प्रमुख विभागीय भरती परीक्षेसाठीची नवीन अर्हता व अभ्यासक्रमाचे विश्लेषण, परीक्षा योजना आणि केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी 1994 मध्ये केंद्र प्रमुखाचे पद निर्माण करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या 10 प्राथमिक शाळांवरील नियंत्रणाकरिता केंद्रप्रमुख पद असते. केंद्र प्रमुखांची जवळजवळ 70 टक्के रिक्त पदे असून ती लवकरच भरली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात रिक्त पदे भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक यांनी पत्राद्वारे सर्व जिल्हा परिषदांकडून रिक्त पदांची माहिती मागवली आहे.
1 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुख रिक्त पदे 50 टक्के पदोन्नती व 50 टक्के विभागीय परीक्षेने भरली जाणार आहेत. केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपवली आहे.
केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा नवीन अर्हता (महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक: ०९ मार्च, २०२३)
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवी
धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा(शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. "
केंद्रप्रमुख वेतनश्रेणी : 9300 - 34800 ग्रेड पे वेतन - 4400
केंद्र प्रमुख विभागीय परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण,तयारीचे स्वरूप व संदर्भ पुस्तके.
केंद्र प्रमुख रिक्त पदे स्पर्धा परीक्षेने भरण्यासाठी अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय 1 डिसेंबर 2022 द्वारे सुधारित व अद्ययावत करण्यात आला असून तो केंद्र प्रमुख पदाच्या कामकाजाशी सुसंगत करण्यात आला आहे.या पदासाठी 200 गुणांची परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत.
पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून होणार आहे.
पेपर क्रमांक एक मध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
पेपर क्रमांक दोन मध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहेत.
केंद्र प्रमुख परीक्षेच्या दोन्ही पेपरचे नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता.
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
■ केंद्रप्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ.
1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (दुसरी आवृत्ती)
2. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर (चौथी आवृत्ती)
3.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)
4. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)
तसेच पेपर एकमधील बुद्धिमत्ता चाचणी व गणितासाठी स्वतंत्रपणे के सागर,नितीन महाले,शांताराम अहिरे,सतीश वसे यांची पुस्तके अभ्यासता येतील.
यामधील शिक्षक अभियोग्यतेशी संबधित कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व घटकांवर उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात.या घटकाच्या तयारीसाठी डॉ शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांचे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.
मराठी भाषिक क्षमतेसाठी के'सागर,बाळासाहेब शिंदे,डॉ.आशालता गुट्टे यांची पुस्तके अभ्यासावीत.
इंग्रजी भाषिक क्षमतेसाठी के सागर, बाळासाहेब शिंदे, सुदेश वेळापुरे यांची पुस्तके अभ्यासता येतील.
■ पेपर क्रमांक दोन- शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह.
यामध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.प्रस्तुत पेपर अभ्यासक्रम पूर्णतः नवीन व केंद्र प्रमुख कामकाजाशी निगडित आहे.
▪️ पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह.
★भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
★शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
★माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
★अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
★माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
★वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
★संप्रेषण कौशल्य - 15 गुण
एकूण - 100 गुण
केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ
१.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (अत्यंत उपयुक्त संदर्भाची दुसरी आवृत्ती)
सदर पुस्तकातून पेपर दोनमध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
तसेच केंद्र प्रमुख परीक्षा पेपर दोनच्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
1.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)
2.शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
केंद्र प्रमुख पेपर क्रमांक एक व दोनचा अभ्यासक्रम अतिशय विस्तृत व व्यापक आहे.केंद्र प्रमुख परीक्षेची जाहिरात शासन पातळीवरील हालचाली पाहता केंद्रप्रमुख जाहिरात लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे, तसेच ही पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त असल्याने लवकरच ती विभागीय परीक्षेद्वारे भरली जातील, तेव्हा केंद्रप्रमुख पदाचा व्यापक अभ्यासक्रम लक्षात घेऊन पात्र शिक्षकांनी सखोल अभ्यासाला त्वरित सुरवात करून परीक्षेतील आपले यश सुनिश्चित करावे.
Best of Luck!
(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments