आज दिनांक 9 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नती करता आवश्यक अहर्ता निश्चित करणे बाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
शासन निर्णय दिनांक एक डिसेंबर 2022 मधील परिच्छेद क्रमांक 5.1 हा वगळण्यात येत असून त्या ऐवजी परीक्षेत क्रमांक 5.1 पुढील प्रमाणे वाचण्यात यावा.
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बीए बी कॉम बीएससी ही पदवी किमान 50% गुणासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा शिक्षण सेवक कालावधी वगळून पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावरून नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केली आहे त्या दिनांक पासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा शिक्षण सेवक कालावधी बघून पूर्ण करणे आवश्यक आहे.
तसेच परिच्छेद क्रमांक सहा मधील प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या ऐवजी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक असे वाचण्यात यावे.
केंद्रप्रमुख पदोन्नती शासन निर्णय दिनांक 1 डिसेंबर 2022
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments