दिनांक 6 मार्च 2023 रोजी होळीची देखील सुट्टी जाहीर करणे बाबत शिक्षणाधिकारी यांचे पत्र.
दिनांक 3 मार्च 2023 रोजी अमरावती शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सन 2022 23 या शालेय सुट्ट्यांचे नियोजनातील मंजूर असलेल्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे अधिकारात एक अतिरिक्त सुट्टी दिनांक दहा मार्च 2023 मराठी माध्यमाच्या शाळांना मंजूर करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
सन 2022 23 चे शालेय सुट्ट्यांचे नियोजनातील शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती यांचे अधिकारातील चालू शैक्षणिक क्षेत्राकरिता एक अतिरिक्त सुट्टी राखीव ठेवण्यात आलेली असून सदरहू सुट्टी उर्दू माध्यमांच्या शाळांना दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी मंजूर करण्यात आली आहे.
तथापि दिनांक एक मार्च 2023 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचे तक्रार निवारण सभेमध्ये सर्व शिक्षक संघटना यांचे पदाधिकारी यांनी सन 2022 23 च्या नियोजनातील माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक यांचे अधिकारातील राखीव असलेली अतिरिक्त सुट्टी दिनांक सहा फेब्रुवारी 2023 रोजी होळी निमित्त मराठी माध्यमांच्या शाळांसाठी मंजूर करण्यात यावी याबाबत सभेमध्ये मागणी करण्यात आलेली आहे.
त्या अनुषंगाने दिनांक एक मार्च 2013 चे सभेतील निर्देशानुसार दिनांक सहा मार्च 2023 रोजी होळीनिमित्त मराठी माध्यमांच्या शाळांना याद्वारे सुट्टी मंजूर करण्यात येत आहे याबाबत मराठी माध्यमांच्या सर्व शाळा मुख्याध्यापक यांना आपले स्तरावरून कळविण्यात यावे असे निर्देश शिक्षण अधिकारी प्राथमिक अमरावती यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
होळीनिमित्त सुट्टी जाहीर करण्याबाबत अमरावती जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे आदेश पुढीलप्रमाणे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments