जिल्हा अंतर्गत बदली अपडेट :-
2022 मधील बदली प्रक्रियेमध्ये ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत अशा सर्व शिक्षकांच्या वैयक्तिक लॉगिनला देखील बदलीचे आदेश उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
त्यासाठी
वरील लिंक वर टच करावे त्यानंतर आपला मोबाईल नंबर नोंदवावा त्यानंतर सेंड ओटीपी वर क्लिक करावे.
आपल्या मोबाईल नंबर वर टेक्स्ट मेसेज आलेला ओटीपी सहा अंकी नोंदवावा त्यानंतर खालील दिलेला कॅपच्या योग्य ठिकाणी नोंदवून लॉगिन करावे.
लॉगिन झाल्यानंतर इंट्रा डिस्टिक वर क्लिक करावे तुम्हाला त्याखाली ट्रान्सफर ऑर्डर असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे.
त्यानंतर डाऊनलोड पीडीएफ वर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये आपली ट्रान्सफर ऑर्डर म्हणजेच बदली आदेश आपल्याला मिळेल.
आपल्याला आदेश प्राप्त झालेला असला तरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातून आपले कार्यमुक्तीचे आदेश निर्गमित केले जातील अशा सूचना सदर आदेशावर दिल्या आहेत.
ऑनलाईन जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या सर्व शिक्षकांच्या बदली आदेश CEO लॉगिन सीओ वरून पब्लिश करण्यात आलेले आहेत.
राज्यातील सर्व जिल्ह्याच्या बदली आदेश Publish झाल्यानंतर शिक्षक लॉगिन RDD मार्फत Enabled केले जाईल.
त्यानंतरच शिक्षक त्यांच्या वैयक्तिक लॉगिन वर स्वतः चा बदली आदेश PDF स्वरूपात Download करून घेऊ शकतात.
शिक्षक बदली अपडेट
अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवरील शिक्षकांच्या मिळालेल्या गावाच्या याद्या जाहीर झाल्या आहेत.
बदली बाबत.
सर्व बदली झालेल्या शिक्षकाना अवगत करण्यात येते की , ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे त्या शिक्षकांच्या इमेल वर बदली झाल्याचे confirmation mail पाठविण्यात आलेले आहेत. आपले इमेल चेक करुन घ्यावेत .
ज्या शिक्षकाना बदली होवुनही इमेल प्राप्त झाले नाहीत त्यांचे इमेल चुकीचे असु शकतात ही पण नोंद घ्यावी.
शिक्षकांना आपले बदली आदेश शिक्षकांसाठी पोर्टल चालू झाल्यावर त्यांच्या स्वतःच्या लॉगिन वरून सुद्धा डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.
लिंक 👇
(सध्या पोर्टल बंद आहे. संध्याकाळी किंवा उद्या सुरू होईल.)
त्याचप्रमाणे संवर्ग एक, संवर्ग दोन, संवर्ग तीन, संवर्ग चार व अवघड क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांचे बदली आदेश सुद्धा CEO लॉगिनला आलेले आहेत.
आज सायंकाळपर्यंत आदेश प्रसिद्ध होतील.
शिक्षकांना त्यांच्या लॉगीन वरुन बदली आदेश डाउनलोड करता येतील.
जिल्हांतर्गत शिक्षक बदली पोर्टल लॉगीन
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments