अवघड क्षेत्रातील जागा भरणे संवर्ग एक लाख होकार किंवा नकार देणे संदर्भात शिक्षणाधिकारी यांचे आदेश.
शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलढाणा व नागपूर यांनी दिनांक 6 मार्च 2023 रोजी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2022 करिता टप्पा क्रमांक सहा विस्थापित शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यापूर्वी विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांना बदली ी बदलीतून सूट हवी किंवा नको याबाबतचा योग्य तो पर्याय निवडणे करता सुविधा उपलब्ध करून दिल्या बाबत निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या ऑनलाइन संगणकीय प्रणाली द्वारे करण्याबाबतची सुधारित धोरण शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेले आहे सदरच्या शासन निर्णयामध्ये अवघड क्षेत्रातील पदे भरावयाची कार्यपद्धती नमूद केली आहे. सध्याच्या बदलीचे एक ते सहा टप्पे पूर्ण झाले असून जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त पदे भरणे आवश्यक असल्यामुळे शासन निर्णयामध्ये नमूद असल्याप्रमाणे ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही.
विशेष संवर्ग भाग एक मधील काही शिक्षकांना अनावधानाने बदलीतून सूट मिळणे बाबतचा पर्याय न स्वीकारल्यामुळे असे शिक्षक व ज्या शिक्षकांची सेवा विद्यमान शाळेत तीन वर्षापेक्षा कमी झालेली आहे अशा शिक्षकांना बदलीतून सूट मिळणे बाबतची संधी यापूर्वी दिलेली नव्हती त्यामुळे ज्या शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे किंवा दहा वर्षापेक्षा जास्त आहे अशा सर्व शिक्षकांची यादी वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झालेली असून सदरची यादी सर्व शिक्षकांच्या माहितीसाठी आज दिनांक 6 मार्च 2023 रोजी जिल्हास्तरावरून ऑनलाइन व ऑफलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीतील जे शिक्षक दिनांक 30 जून 2022 पर्यंत विशेष संवर्ग भाग एक ची पात्रता धारण करत असतील अशा सर्व शिक्षकांना दिनांक 6 मार्च 2023 ते 8 मार्च 2023 या कालावधीत बदलीतून सूट हवी किंवा नको याबाबतची योग्यता पर्याय निवडण्यासंदर्भात सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे आज दिनांक 6 मार्च 2023 ती 08 मार्च 2023 या कालावधीमध्ये आपल्या तालुक्यातील विशेष संवर्ग एक ची पात्रता धारण करीत असणाऱ्या शिक्षकांना आपले स्वतःचे ऑनलाइन लोगिन करून बदलीतून सूट हवी किंवा नको याबाबत योग्य तो पर्याय निवडणे बाबत सूचित करण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांना शिक्षण अधिकारी प्राथमिक दिले आहे.
वरील शिक्षणाधिकारी यांचे पत्र व दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी चे ग्रामविकास विभागाचे आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments