अवघड क्षेत्रातील रिक्त राहिलेला जागा भरण्याच्या राऊंड संदर्भात विन्सइस ने उपस्थित केलेले प्रश्न व त्यावर ग्रामविकास विभागाने दिलेले स्पष्टीकरण शासन आदेश.
विन्सइस आयटी प्रायव्हेट लिमिटेड पुणे, या बदली पोर्टलवर काम करणाऱ्या कंपनीने आवडत क्षेत्रात रिक्त राहिलेला जागा भरण्यासाठीच्या राऊंड संदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या संदर्भात ग्रामविकास विभागाने दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी त्या मुद्द्यांबाबतचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे कळविले आहे.
1)
निलंबित शिक्षकांची माहिती सिस्टीम मध्ये नाही आणि जर ही माहिती अद्यावत करावयाची असेल तर ही प्रक्रिया खर्चिक व वेळ खाऊ आहे या संदर्भात आरडीडी ने मार्गदर्शन करावे.
श्रीमती अलका सोनवणे प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा लामकानी मुले तालुका जिल्हा धुळे या दिनांक एक डिसेंबर 2022 पासून निलंबित असल्याचे जिल्हा परिषद धुळे यांनी दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी कळविले आहे ऑनलाइन बदली पोर्टलवर शिक्षकांची माहिती भरण्याची कार्यवाही ही एक डिसेंबर 2022 पूर्वी सुरू झालेली आहे श्रीमती सोनवणे या तत्पूर्वी निलंबित नव्हत्या त्यामुळे बदली प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचे नाव बदली प्रक्रियेतून वगळणे योग्य होणार नाही.
पोर्टलवर माहिती अपडेट झाल्यानंतर निलंबित शिक्षकांची नावे पोर्टलवरून वगळता येणार नाही.
2) ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत तीन वर्ष पूर्ण झाली नाहीत यांना विशेष संवर्ग एक अथवा दोन मध्ये अर्ज करण्यास परवानगी दिली नव्हती असे शिक्षक दहा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या यादीत समाविष्ट होतील का?
ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 1.10 नुसार बदली पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात निश्चित धरावयाची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकांची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेले पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही असे नमूद आहे त्यामुळे सदर शासन निर्णयातील 1.10 नुसार कार्यवाही करावी.
कोणताही शिक्षक ज्याची सेवा सुगम क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झाली आहे त्याची सेवा शाळेत सलग तीन वर्ष किंवा पाच वर्ष असो किंवा नसो त्याची बदली अवघड क्षेत्रात होऊ शकते.
3) पती व पत्नी दोघे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर त्यापैकी एकानेच अर्ज करावा दुसऱ्या जोडीदाराचे नाव जर बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत समाविष्ट असल्यास त्याचे नाव या यादीतून कमी करण्यात यावे हा मुद्दा शासन निर्णय सात एप्रिल 2021 च्या पृष्ठ क्रमांक 24 व नमूद केला आहे अशा शिक्षकांचे काय करावे? त्यांना अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी काढलेल्या बदली पात्र शिक्षकांच्या यादीतून वगळावे काय आणि वगळायचे असेल तर नवीन याद्या प्रसिद्ध कराव्या लागतील.
ग्रामविकास विभाग शासन निर्णय सात एप्रिल 2019 मधील विवरणपत्र चार खालील टीप क्रमांक एक पती-पत्नी दोघे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर त्यापैकी एकानेच अर्ज करावा दुसऱ्या जोडीदाराचे नाव जर बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत समाविष्ट असल्यास त्याचे नाव यादीतून कमी करण्यात यावे असे नमूद आहे त्यामुळे अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी काढलेल्या बदली पात्र शिक्षकांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात यावे. याचा अर्थ ज्या
शिक्षक पती पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज केला आहे अशापैकी कोणाचेही नाव अवघड क्षेत्रात बदली पात्र शिक्षकांच्या यादीत समाविष्ट होणार नाही.
4) शासन निर्णय क्रमांक आंतरजिल्हा बदली दिनांक 15 फेब्रुवारी 2018 मध्ये जिल्हा परिषदेतील महिला शिक्षकांना दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये नियुक्ती न देण्याबाबत नमूद केले आहे. या अनुषंगाने जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महिला शिक्षकांना काम करण्यास प्रतिकूल अशा अवघड क्षेत्रातील शाळा महिला शिक्षकांना काम करण्यास प्रतिकूल म्हणून घोषित करण्याची कार्यवाही करावी अशाप्रकारे महिला शिक्षकांना काम करण्यास प्रतिकूल शाळांमध्ये महिला शिक्षकांना प्रशासकीय बदलीने अथवा नियुक्तीने पदस्थापना देण्यात येऊ नये.
सन 2022 23 मधील बदलांच्या अनुषंगाने दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी पार पडलेल्या बैठकीच्या इतिवृत्तात पुढील प्रमाणे नमूद करण्यात आले आहे त्यानुसार.
कोणतीही आणि कोणत्याही गावातील शाळा महिलांसाठी अयोग्य जाहीर करण्यात येऊ शकत नाही ते आर्टिकल 14 भारतीय संविधान याच्या विरोधी आहे. त्यामुळे ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक इत्यादी संवर्गातील महिलांना अशा प्रकारचा प्रतिबंध नाही त्यामुळे महिला शिक्षकांसाठी देखील अशा प्रकारचा प्रतिबंध असू शकत नाही. अशा क्षेत्रातील मुलांच्या योग्य विकासासाठी व त्यांच्या सुरक्षिततेच्या साठी ते अयोग्य ठरेल त्याचप्रमाणे मुलींच्या शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी देखील हे अयोग्य ठरेल त्यामुळे अवघड क्षेत्रात काम करण्यासाठी स्त्रियांना देखील संधी उपलब्ध करून देण्यात यावी.
वरील विचारात घेऊन अवघड क्षेत्रातील रिक्त भरण्याची कार्यवाही शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 नुसार करावी.
याचा अर्थ अवघड क्षेत्रात महिला शिक्षकांची देखील बदली होऊ शकते.
वरील संपूर्ण पत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments